पाकशी लष्करी नातं ठेवणार नाही, पुतिन यांची ग्वाही

पाकशी लष्करी नातं ठेवणार नाही, पुतिन यांची ग्वाही

पाकशी मैत्री वाढली तरी त्याचा भारताशी असलेल्या संबंधांवर कोणतेही परिणाम होणार नाही अशी ग्वाही रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी दिलीये.

  • Share this:

01 जून : पाकशी मैत्री वाढली तरी त्याचा भारताशी असलेल्या संबंधांवर कोणतेही परिणाम होणार नाही अशी ग्वाही रशियाचे राष्ट्रपती  व्लादिमीर पुतिन यांनी दिलीये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. भारताशी रशियाचे जवळचे संबंध आहेत. पाकशी आम्ही घट्ट लष्करी नातं ठेवणार नाही. दहशतवादाचा उगम कुठूनही झाला तरी तो अमान्यच आहे, असं पुतिन यांनी म्हटलंय.

तसंच मिसाईल तंत्रज्ञानात रशियाचे जितके भारताशी संबंध आहेत, तितके कुणाशीही नाहीत असंही पुतिन म्हणाले. तसंच काश्मीरच्या प्रश्नावर त्यांनी हा तुमच्या हा अंतर्गत वाद आहे. सर्व देशांच्या नात्यांमध्ये उतार चढाव असतात. पण भारत आणि रशियात तसं कधी झालंच नाही, असं मोदी म्हणाले.

दरम्यान, भारत आणि रशियाने तामिळनाडूमधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला कराराला अंतिम स्वरूप दिलंय. लवकरच या करारवर अंतिम मोहर उमटण्याची शक्यता आता अधिक बळावलीये.

First published: June 1, 2017, 11:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading