S M L

डोकलाम आपलाच भाग असल्याचा चीनचा दावा,भारत-चीन तणाव वाढला

भारत डोकलामच्या सीमेवरून आपलं सैन्य मागे घेत नाही तोपर्यंत उभय देशांतील संबंध पूर्ववत होणं अशक्य असल्याची दर्पोक्ती चीनने या निवेदनातून व्यक्त केलीय.

Sonali Deshpande | Updated On: Jul 6, 2017 02:53 PM IST

डोकलाम आपलाच भाग असल्याचा चीनचा दावा,भारत-चीन तणाव वाढला

06 जुलै : डोकलाम मुद्यावर चीनची आगळीक सुरूच आहे. भूतानचा डोकलामवरचा दावा चुकीचा असल्याचा दावा चीनने केलाय. याबाबत चीनने एक निवेदन प्रसिद्ध केलं असून त्यात डोकलाम हा चीनचाच भाग असल्याचा पुनरूच्चार करण्यात आलाय.

भारत या मुद्द्यावर सगळ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप चीनने केलाय. भारत डोकलामच्या सीमेवरून आपलं सैन्य मागे घेत नाही तोपर्यंत उभय देशांतील संबंध पूर्ववत होणं अशक्य असल्याची दर्पोक्ती चीनने या निवेदनातून व्यक्त केलीय.

सिक्किम सीमेवर भारत आणि चीनच्या लष्करांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष होताना पाहायला मिळतोय. यामुळे दोन्ही देशांमधील संबंधदेखील ताणले गेलेत. चीनकडून सातत्यानं भारताच्या हद्दीत घुसखोरी केली जातेय. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये चिनी सैनिकांच्या घुसखोरीचं प्रमाण वाढलंय.  गेल्या तीन दिवसांमध्ये तीनवेळा चीनकडून तीन वेळा लडाखमध्ये घुसखोरी करण्यात आलीय.

उत्तर लडाखमधील ट्रॅक जंक्शन, मध्य लडाखच्या प्योगोंगशोक लेक आणि दक्षिण लडाखच्या चुमरमध्ये चीनकडून सातत्यानं घुसखोरी केली जातेय. गेल्या ४५ दिवसांमध्ये चिनी सैन्याने तब्बल १२० वेळा सीमा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2017 09:40 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close