Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

आता गुन्हे नकोत! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका पोलिसांचं गुन्हेगारांना आवाहन

आता गुन्हे नकोत! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका पोलिसांचं गुन्हेगारांना आवाहन

अमेरिकेतील अनेक राज्यांतील पोलिसांनी अशा प्रकराचा संदेश सोशल मीडियावर टाकलं आहे. आणि जगभरात त्याची चर्चा होत आहे

अमेरिकेतील अनेक राज्यांतील पोलिसांनी अशा प्रकराचा संदेश सोशल मीडियावर टाकलं आहे. आणि जगभरात त्याची चर्चा होत आहे

अमेरिकेतील अनेक राज्यांतील पोलिसांनी अशा प्रकराचा संदेश सोशल मीडियावर टाकलं आहे. आणि जगभरात त्याची चर्चा होत आहे

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 18 मार्च : कोरोना व्हायरसच्या विळख्यामुळे बर्‍याच क्षेत्रांमधील कामांवर परिणाम होत आहे. पोलिसांपासून ते अगदी डॉक्टरांपर्यंत प्रत्येकजण लोकांना वाचविण्याचा पूरेपूर प्रयत्न करीत आहे. हे लक्षात घेता अमेरिकेतील बर्‍याच राज्यांच्या पोलिसांनी गुन्हेगारांना एक आवाहन केलं आहे.

अमेरिकेतील पोलिसांनी केलेलं हे आवाहन सध्या समाज माध्यमांवर चांगलंच चर्चिलं जात आहे. पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारांना आवाहन केले आहे. त्यांनी लिहिलं आहे की, 'जोपर्यंत देशात कोरोनाचा प्रभाव आहे, तोपर्यंत कोणताही गुन्हा करू नका.'

संबंधित - ...आणि खोकल्यातून रक्त आलं, कोरोना बाधीत व्यक्तीचा अंगावर शहारे आणणारा VIDEO

फ्युलिप पोलीस विभागाने ट्विट करुन गुन्हेगारांना अपील केलं आहे की, ‘सध्या कोरोना व्हायरसमुळे देशातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे, अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया थांबवाव्यात असे आम्ही आवाहन करतो. गुन्हेगारी कमी करण्यासाठी आम्ही आपल्या सहकार्याबद्दल आभारी आहोत. जेव्हा परिस्थिती सामान्य होईल, तेव्हा आम्ही आपल्याला कळवू आणि मग आपण आपले काम सुरू करा.’

फ्युलिप पोलिसांप्रमाणेच ओहिया, युटा, वॉशिंग्टनसह डझनभर  शहरांमध्ये आणि  राज्य पोलीस प्रशासनाच्या वतीने सोशल मीडियावर असेच आवाहन करणारे पोस्ट करण्यात आले आहे.

अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांमध्ये सातत्याने वाढ

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत अमेरिकेत कोरोना व्हायरसचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत येथे 6500 हून अधिक पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आली आहेत. येथे मृतांचा आकडा 100च्या वर गेला आहे. कोरोनाचा विचार करता अमेरिकेने युरोपियन देशांतील विमान कंपन्यांवर बंदी घातली आहे.

हे वाचा - HIV बाधित बापाने पोटच्या पोरीवर 7 वर्ष केला बलात्कार, न्यायाधीशही झाले सुन्न

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कोरोना या व्हायरसला  राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी घरीच राहावे आणि आवश्यकतेनुसारच घराबाहेर पडा. अमेरिकेतील सुमारे 40 राज्यांमध्ये सार्वजनिक शाळा, बार, रेस्टॉरंट्स बंद ठेवण्यात आली आहेत.

First published: