Home /News /videsh /

Ukraine प्रश्नी तोडगा निघेल, असं वाटत नाही! चर्चेपूर्वीच अमेरिका-रशियाची हतबलता

Ukraine प्रश्नी तोडगा निघेल, असं वाटत नाही! चर्चेपूर्वीच अमेरिका-रशियाची हतबलता

युक्रेन मुद्द्यावरून अमेरिका आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री चर्चा करत आहेत. मात्र या चर्चेतून अंतिम तोडगा निघण्याची शक्यता नाही, असं चर्चेपूर्वीच दोघांनीही जाहीर केलं आहे.

    जिनेव्हा, 21 जानेवारी: युक्रेन (Ukraine) प्रश्न हा मर्यादेच्या पलीकडे बिकट (Complicated) झाला असून एका बैठकीत (Meeting) त्यावर तोडगा (Solution) निघेल, असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी (Foreign ministers of both countries) दिली आहे. शुक्रवारपासून दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्वित्झर्लंडमध्ये (Switzarland) बैठक सुरू झाली आहे. या बैठकीदरम्यान प्रसारमाध्यमांना दोघांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आशावाद व्यक्त केला असला तरी युक्रेनचा प्रश्न हा काही एका बैठकीत तोडगा काढण्याएवढा साधा नसून त्यासाठी दीर्घ प्रक्रियेची वाट पाहावी लागेल, असे संकेत दोन्ही देशांनी दिले आहे.  तोडगा नाही, पण तणाव निवळेल अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकेन आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सेरगेई लोवरोव्ह यांनी स्वित्झर्लंडमध्ये एकमेकांसोबत हस्तांदोलन करून चर्चा सुरू केली आहे. या चर्चेतून आपल्याला ताबडतोब अंतिम उत्तर मिळावं, अशी अपेक्षाच नसल्याचं ब्लिंकेन आणि लोवरोव्ह यांना सांगितलं आहे. मात्र वातावरणातील तणाव निवळण्यासाठी या चर्चेचा नक्कीच फायदा होईल, अशी अपेक्षा अमेरिेकनं व्यक्त केली आहे. दोन्ही बाजूंनी शस्त्रसज्जता आणि सेन्याची जमवाजमव सुरू असताना अशा प्रकारे दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये होणाऱ्या या चर्चेकडं संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे.  राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या विधानाने तणाव या बैठकीपूर्वी अमेरिेकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बुधवारी केलेल्या एका विधानामुळे रशिया आणि अमेरिकेतील तणाव अधिकच वाढला आहे. रशिया युक्रेनवर घुसखोरी करेल आणि त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल, असं विधान राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी केलं होतं. अमेरिकेच्या या विधानावर रशियाने नाराजी व्यक्त केली होती.  हे वाचा - काय आहे प्रकरण? रशियाचा शेजारी असणाऱ्या युक्रेनचे युरोपीय देशांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे युक्रेनचा समावेश नाटो देशांच्या यादीत होण्याची शक्यता आहे. रशियाला हे मान्य नसून युक्रेनचा समावेश नाटोमध्ये करण्यास विरोध आहे. नाटो आणि अमेरिका यांनी युक्रेनचा समावेश नाटोत होणार नसल्याची लेखी हमी द्यावी, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जावं, असं आव्हान रशियानं दिलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: America, Russia, Ukraine news

    पुढील बातम्या