जिनपिंग यांच्याकडून मोदींचं कौतुक!

जिनपिंग यांच्याकडून मोदींचं कौतुक!

मोदी आणि सी जिनपिंग यांनी हसतमुखाने हस्तांदोलन करत अनौपचारिक भेटही घेतली.

  • Share this:

 

हॅमबर्ग, 6 जुलै: सिक्किमच्या सीमेवर तणावाचं वातावरण असतानाही तिकडे जी 20 परिषदेत मात्र, चीनच्या अध्यक्षांकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चक्क जाहीरपणे कौतुक करण्यात आलंय. जागतिक दहशतवाद आणि वैश्विक व्यापारसारख्या महत्वाच्या मुद्यांवर सहभागी देशांनी एकत्र येण्याची गरज सर्वच राष्ट्रपमुखांनी बैठकीत व्यक्त केली. एवढंच नाहीतर मोदी आणि सी जिनपिंग यांनी हसतमुखाने हस्तांदोलन करत अनौपचारिक भेटही घेतली. त्यामुळे सर्वच जण बुचकाळ्यात पडलेत. कारण डोकलाम हद्दीच्या वादातून भारत-चीन सीमेवर सध्या काहिसं तणावाचं वातावरण आहे.

येत्या सप्टेंबरमध्ये ब्रिक्स सदस्य देशांचं चीनमध्ये संमेलन होतंय.त्यासाठी चीनकडून सदस्य राष्ट्रांना रितसर निमंत्रणही यावेळी देण्यात आलं. त्यामुळे सिक्किमच्या वादातून युद्धाची धमकी देणारा हाच चीन देश आहे का, अशीही शंका अनेकांना आल्यावाचून राहणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यावेळी भारतात नव्याने लागू झालेल्या जीएसटी या एक देश एक प्रणालीचा दाखला देत आंतरराष्ट्रीय पातळीवरही आर्थिक सुधारणांमध्ये एकसूत्रीपणा आणण्याची गरज व्यक्त केली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम आणि रशियाचे पंतप्रधान व्लामिदिर पुतिन यांनीही यावेळी आवर्जून हस्तांदोलन केल्याचं बघायला मिळालं. दोन दिवस ही जी 20ची परिषद चालणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विकासाबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

जी 20 परिषदेत सहभागी झालेले देश 

अर्जंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, भारत, इंडोनिशया, इटली, जापान, मेक्सिको, रूस, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्कस्थान, ब्रिटन आणि अमेरिका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2017 05:02 PM IST

ताज्या बातम्या