एका बँक कर्मचाऱ्याच्या समयसूचकतेमुळे नीरव मोदीला झाली अटक, जाणून घ्या काय घडलं

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना फसवणाऱ्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्याला जामीनही नाकारलं गेलं.

  • Share this:

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना फसवणाऱ्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्याला जामीनही नाकारलं गेलं. नीरव मोदीला अटक झाली ती एक बँक कर्मचाऱ्याच्या समयसूचकतेमुळे.

नीरव मोदी लंडनमध्ये मेट्रो बँकेच्या एका कर्मचाऱ्यामुळे पकडला गेला. तो बँकेत खातं उघडायला गेला होता.

बँक कर्मचाऱ्यानं नीरव मोदीला ओळखलं. त्यानं स्काॅटलँड यार्डला कळवलं. तसे पोलीस ताबडतोब बँकेत पोचले. नीरवला पकडलं. त्याला जिथून पकडलं त्यावरून हे लक्षात येतं की तो वेस्ट एंडच्या सेंटर पाॅइंटमध्ये आलिशान अपार्टमेंटमध्ये रहात होता.

नीरव मोदीकडे तीन पासपोर्ट आहेत. भारतीय एजन्सींनी नीरव मोदीचे पासपोर्ट रद्द केले होते. नीरवचा एक पासपोर्ट मेट्रोपोलिटन पोलिसांकडे आहे. दुसरा ब्रिटनच्या गृहविभागाकडे आहे. तो आता संपलाय. आणि तिसरा पासपोर्ट ड्रायव्हिंग अँड व्हेइकल लायसेसिंगकडे आहे. ते तीनही पासपोर्ट ब्रिटनमध्येच आहेत.

नीरव मोदीकडे रेसिडन्सी कार्डही आहेत. सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात, हाँगकाँग या देशाची कार्ड त्याच्याकडे आहेत.

भारतीय बँकिंग क्षेत्रात 13 हजार कोटींचा घोटाळा केल्यानंतर नीरव मोदी वर्षभरापूर्वी भारतातून फरार झाला होता. त्यानंतर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्थरांवर प्रयत्न करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं 2018च्या जुलै महिन्यांत नीरव मोदीच्या नावे रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 11:47 AM IST

ताज्या बातम्या