घराची चावी हरवली म्हणून गर्लफ्रेंडच्या घरी राहिला, झोपेतच केला बलात्कार

घराची चावी हरवली म्हणून गर्लफ्रेंडच्या घरी राहिला, झोपेतच केला बलात्कार

ब्रिटीश पीडित मुलगी म्हणते की, तिने मुलाला स्पष्ट सांगितले होते की तिची तब्येत ठीक नाही आणि तिला लैंगिक संबंध ठेवायचे नाहीत. पण

  • Share this:

ब्रिटन, 17 डिसेंबर : देशात धक्कादायक बलात्काराच्या घटना समोर येत आहे. या सगळ्यात एक पीडित तरुणीने तिच्यासोबत झालेल्या बलात्काराची कहानी सगळ्यांना सांगितली आहे. 21 वर्षीय मुलीने तिचा प्रियकर तुरुंगात गेल्यानंतर सगळ्या घटनेचा उलगडा केला आहे.  पीडित तरुणीने सांगितलेल्या माहितीनुसार, तिचा प्रियकर घरासमोरच राहत होता. एक दिवस प्रियकराने सांगितले की, तो आपल्या घराची चावी विसरला आहे आणि त्याचे पालक कॉल उचलत नाही आहेत. त्यामुळे तो मुलीच्या घरीच राहिला. सध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे

ब्रिटीश पीडित मुलगी म्हणते की, तिने मुलाला स्पष्ट सांगितले होते की तिची तब्येत ठीक नाही आणि तिला लैंगिक संबंध ठेवायचे नाहीत. पण जेव्हा ती जागी झाली, तेव्हा तिने स्वत: ला नग्न अवस्थेत पाहिले. त्यानंतर त्यांच्यात प्रचंड वाद झाल्याचंही तिने सांगितले.

इतर बातम्या - दुसऱ्यांना फाशीवर लटकवणाऱ्या जल्लादला किती असतो पगार?

द सनच्या वृत्तानुसार, घटनेनंतर जेव्हा मुलगी जागी झाली तेव्हा ती ओरडली. 23 वर्षांचा मुलगा हेडन पैथानने खरं सांगितलं. हेडन कस्टमर सर्विस एडवाइजर म्हणून कंपनीत काम करत होता. मुलगी हेअर ड्रेसर म्हणून काम करायची. घटनेनंतर घाबरून पीडितेने घडलेला प्रकार कुटुंबाला किंवा मित्रांना सांगितला नाही.

इतर बातम्या - ज्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार झाला ती कुठे आहे? वाचा धक्कादायक सत्य

पण या सगळ्याचा तिला मानसिक त्रास होत होता. त्यामुळे तिने गुपचूप तिच्या बॉयफ्रेंडशी संभाषण फोनमध्ये रेकॉर्ड केलं. ज्यामध्ये त्याने बलात्काराची कबुली दिली. नंतर, जेव्हा पीडित तरुणी या प्रकरणी तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात गेली. आणि आरोपी बॉयफ्रेंडविरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

हेडनने न्यू कॅसल क्राउन कोर्टात गुन्ह्याची कबुली दिली. त्याला 4 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याचे नाव लैंगिक गुन्हेगाराच्या रजिस्टरमध्ये लिहिण्याचे आदेशही कोर्टाने दिले.

इतर बातम्या - मृत्यूच्या 50 वर्षांनंतरही ड्यूटीवर आहे सैनिकाचा आत्मा, महिन्याला मिळतो पगार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2019 03:42 PM IST

ताज्या बातम्या