Home /News /videsh /

Shocking! Honeymoon वर असताना नवऱ्याकडून झाली एक चूक; बायकोचा जागीच मृत्यू

Shocking! Honeymoon वर असताना नवऱ्याकडून झाली एक चूक; बायकोचा जागीच मृत्यू

हनीमूनला गेलेल्या कपलसोबत भयंकर दुर्घटना घडली.

    कॅनबेरा, 23 जून : लग्न होताच कपलला प्रतीक्षा असते ती हनीमूनची. असंच उत्साहात हनीमूनला एक कपल गेलं. पण त्यांच्यासोबत भयंकर दुर्घटना घडली. हनीमूनवर असताना नवऱ्याकडून एक अशी चूक झाली, ज्यामुळे बायकोचा मृत्यू झाला. हनीमूनसाठी गेलेल्या नवविवाहितेचा दुर्दैवी अंत झाला. ऑस्ट्रेलियातील हे धक्कादायक प्रकरण आहे (Bride died on honeymoon). सिडनीत राहणारी 29 वर्षांची मारिना मोर्गनचं 10 दिवसांपूर्वीच रॉबीसोबत लग्न झालं. त्यानंतर दोघंही हनीमूनसाठी क्वीसलँडला गेले. हॅमिल्टन आयलँडवर ते एका गोल्फ बग्गीतून फिरत होते. रॉबी बग्गी चालवत होता आणि मारिना त्याच्या शेजारी बसली. त्याचवेळी रॉबीकडून एक चूक झाली आणि त्याने मारिनाला कायमचं गमावलं. व्हिट्संडे बाउलेवार्डवर बग्गी चालवताना रॉबीने अचानक यू-टर्न घेतला आणि बग्गी पलटली. त्यावेळी  एक डॉक्टर, ऑफ ड्युटी डेंटिस्ट आणि फायर फायटर त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी मारिनाला 35 मिनिटं सीपीआर दिला. तिला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले पण तिला वाचवता आलं नाही. हे वाचा - VIDEO - अवघ्या 10 सेकंदावर होता मृत्यू; तरी ट्रॅकवर प्रवाशाला वाचवायला गेला रेल्वे कर्मचारी आणि... मीडिया रिपोर्टनुसार पोलीस अँथोनी कोव्हा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, या घटनेत खतरनाक ड्रायव्हिंग केल्याचं किंवा हे कपल नशेत होतं, असे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. अशा गाड्या चालवण्याचा अनुभव नसल्याने ही दुर्घटना झाली असावी. गाडीची बॅटरी संपत होती आणि चार्जिंग पॉइंटपर्यंत पोहोचायचं असावं म्हणून त्यांनी यूटर्न घेतला असावा.  घाईत यू-टर्न घेण्यासाठी गाडी वळवली आणि ती उलटली. महिलेने सीट बेल्टही घातलं नव्हतं. क्वीसलँड एम्ब्युलन्स सर्व्हिसचे ग्रीम मॅकइंटायर यांनी सांगितलं की, पॅरामेडिकल स्टाफ काही मिनिटांत तिथं पोहोचला. महिलेला हार्ट अटॅक आला होता. 35 मिनिटं तिला सीपीआ देण्यात आला पण तिला वाचवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Accident, Australia, Couple, World news

    पुढील बातम्या