Home /News /videsh /

कोरोना नियंत्रणाबरोबर न्युझीलँडच्या महिला पंतप्रधानांना मिळालं आणखी मोठं यश; जनतेने केलं कौतुक

कोरोना नियंत्रणाबरोबर न्युझीलँडच्या महिला पंतप्रधानांना मिळालं आणखी मोठं यश; जनतेने केलं कौतुक

कोरोना महासाथीत येथे केवळ 25 जणांचा मृत्यू झाला, याचं श्रेय जनतेने पंतप्रधानांना दिलं आहे

    वेलिंगटन, 17 ऑक्टोबर : न्यूजीलँडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान होणार आहेत. पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांच्या केंद्र-वाम लेबर पार्टीने न्यूजीलँडच्या निवडणुकीत मोठ यश संपादन केलं आहे. न्यूज एजेंसी राॅयटर्सनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस महासाथीमध्ये  (Coronavirus Pendemic) कडक पद्धतीने कारवाई करीत सामना केल्यानंतर देशात त्यांची लोकप्रियता खूप वाढली आहे. याच कारणामुळे त्यांना पुन्हा सत्ता मिळाल्याचे सांगितले जात आहे. 40 वर्षीय अर्डर्न यांच्या पक्षाने 2017 मध्ये दोन अन्य पक्षांसोबत आघाडी करीत सरकार स्थापन केले होते, ज्यानंतर त्यांना पंतप्रधानपद देण्यात आलं. वर्ष 1996 मध्ये जेव्हापासून न्‍यूजीलँडमध्ये अनुपातिक वोटिंग प्रणालीची सुरुवात झाली आणि 24 वर्षांनंतर इतिहासात पहिल्यांदा राजकीय पक्षाला इतकं बहुमत मिळालं.  लेबर पार्टीसाठी हे अनेक दशकांमध्ये मिळालेलं सर्वात मोठं यश आहे. हे ही वाचा-George Floyd च्या जन्मदिवशी एकत्र आले अमेरिकन्स, कटू आठवणींमुळे नागरिक भावुक कोरोनामुळे अवघ्या 25 जणांचा मृत्यू आरड्रेन यांनी या निवडणुकीला 'कोविड इलेक्‍शन'चं नाव दिलं आहे. सोबतच त्यांनी सरकारचा प्रचारदेखील महासाथ संपल्यानंतर आणि व्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन रोखण्याच्या यशानंतरच केला आहे. न्‍यूजीलँडची लोकसंख्या 50 लाख इतरी असून कोरोनामुळे येथे केवळ 25 जणांचा मृत्यू झाला. कोरोना व्यतिरिक्त मार्च 2019 मध्ये क्राइस्ट चर्चमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ज्या प्रकारे आरड्रेन एक नेता म्हणून समोर आली होती, त्यामुळे देखील त्यांची लोकप्रियता वाढीस लागली होती. त्या हल्ल्यात 51 जणांचा मृत्यू झाला होता. संपूर्ण जग कोरोना लशीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान रशियाने आपल्या दोन कोरोना लशींना मंजुरी दिली आहे. आपली तिसरी लसही तयार असल्याचा दावा रशियाने केला आहे. आता रशियानंतर आणखी एका देशाची कोरोना लस सज्ज झाली आहे. नोव्हेंबरमध्येच या लशीला मंजुरी मिळण्यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या