न्यूझीलंड, 24 फेब्रुवारी : सकारात्मकता आणि इच्छाशक्ती मजबूत असेल तर माणूस कोणत्याही अगदी जीवघेण्या संकटावरही यशस्वी मात करु शकतो. अशाच एका जीवघेण्या संकटावर एका नाविकाने मात केली. बुडत्याला काडीचा आधार या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव घेत समुद्रातील कचऱ्याच्या तुकड्याचा आधार घेत त्याने 14 तास पाण्यात काढले. प्रशांत महासागरातील (Pacific Ocean) एका मालवाहू जहाजावरील (Cargo Ship) नाविक (Sailor) समुद्रात पडला. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर या नाविकाने समुद्रात 14 तास काढले. त्यानंतर यंत्रणांना त्याला वाचवण्यात यश आले. समुद्रातील कचऱ्याच्या तुकड्यांचा आधार घेत या नाविकाने पाण्यात 14 तास काढल्याचे त्याच्या मुलाने सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, पहाटेच्यावेळी प्रशांत महासागरात असलेल्या एका मालवाहू जहाजातून 52 वर्षीय नाविक विदम पेरेव्हर्तिलोव्ह हे पाण्यात पडले, त्यानंतर ते 14 तास पाण्यातच होते. बचावासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. अखेरीस त्यांना वाचवण्यात यश आले. "मी लाईफ जॅकेट (Life Jacket) घातलं नव्हतं. ब्लॅक डॉटच्या दिशेने पोहण्याचा निर्णय घेतल्यानेच बचावलो. मच्छिमारांसाठी असलेल्या खूणेची काठी मी बचावासाठी घट्ट धरुन ठेवली होती", त्यांनी सांगितलं.
न्युझीलंड न्यूज साईटच्यावृत्तानुसार, विदम यांचा 20 वर्षीय मुलगा खूप थकलेला दिसत होता, पण तो जिवंत होता.
BBC ने दिलेल्या वृत्तानुसार पेरेव्हर्तिलोव्ह हे न्यूझीलंडमधील टोरंगा बंदर ते ब्रिटीश प्रदेशातील पिटकेर्न दरम्यान पुरवठदार म्हणून काम करणाऱ्या सिल्व्हर सपोर्टरमध्ये लिथुआनियन मुख्य अभियंता आहेत. इंजिन रुममधील इंधन पंपामध्ये बदल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा पंप गरम आणि जड झाला होता, असे त्यांच्या मुलाने सांगितले. या घटनेपूर्वी 16 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजता ते रिकव्हरीसाठी डेकवरुन बाहेर पडले. मारात याला आपल्या वडीलांच्या घटनेचा तपशील मेसेज चॅटच्या माध्यमातून मिळत होता. वडील बाहेर पडल्यावर कदाचित त्यांना मुर्च्छा आली असावी, त्यामुळे पुढची घटना त्यांना नीट आठवत नाही.
विशेष म्हणजे जहाजावरुन कोणी माणूस पाण्यात पडला आहे, याची माहिती जहाजावरील कोणत्याही व्यक्तीला नव्हती. त्यामुळे जहाज तसेच पुढे निघून गेले.
आपल्या जहाजावरील एक अभियंता गायब आहे हे जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येण्यास सुमारे 6 तास लागले. त्यानंतर कप्तानने जहाज वळवले. अहवालानुसार, पेरेव्हर्तिलोव्ह यांच्या जहाजावरील कामाच्या नोंदी पाहून कर्मचाऱ्याने त्यांचे अंदाजे स्थान निश्चित केले. त्यानुसार पहाटे 4 वाजेपर्यंत ते जहाजावर होते त्यानंतर ते गायब झाले होते. त्यावेळी जहाज फ्रेंच पोलिनेशिया ऑस्ट्रेलियन बेटांच्या दक्षिणेला सुमारे 400 सागरी मैलांवर होतं. त्यानंतर जहाजावरुन संदेश पाठवण्यात आले. ताहिती येथून फ्रेंच नौदलाची विमाने (French Neavy) शोधकार्यात सामील झाली. फ्रान्सच्या हवामान विभागाने (Metrological Department) वाऱ्याच्या दिशेचा अभ्यास करुन व्यक्ती कोणत्या दिशेने वाहत गेली असेल त्याचा अंदाज बांधला.
(हे पहा : इंडोनेशियातील मच्छीमाराच्या जाळ्यात अडकला विचित्र शार्क; चेहरा अगदी माणसांसारखा )
news सूर्योदय होईपर्यंत पेरेव्हर्तिलोव्ह यांची पाण्यात तग धरण्यासाठी धडपड सुरुच होती. सुर्यप्रकाशात त्यांना दूरवर एक काळा ठिपका दिसला आणि त्यांनी त्या दिशेने पोहण्याचा निर्णय घेतला. हा ठिपका म्हणजे बोटीवरील नांगरलेला किंवा पाण्यात घट्ट रोवलेला असा कोणताही भाग नव्हता तर तो फक्त समुद्रातील कचऱ्याचा तुकडा होता, असे मारात याने सांगितले.
जेव्हा पेरेव्हर्तिलोव्ह यांना दूरवर आपले जहाज दिसतातच त्यांनी त्या दिशेने इशारा करण्यास सुरुवात केली. यावेळी जहाजातील एका प्रवाश्याला समुद्रातून कोणी माणूस ओरडत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर जहाजातील लोकांनी पेरेव्हर्तिलोव्ह यांना मदतीचा हात देत पुन्हा जहाजावर आणलं.
त्यांची जिवंत राहण्याची इच्छा दांडगी होती. कदाचित मी असतो तर लगेच बुडालो असतो. परंतु ते नेहमीच तंदुरुस्त आणि निरोगी होते त्यामुळेच ते जगू शकले, असे मारात याने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand