वेलिंग्टन, 09 जून : सारं जग सध्या कोरोना सारख्या अदृश्य संकटाशी दोन हात करत आहे. अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोनावर मात करू शकला नाही आहे. आतापर्यंत 67 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर, दुसरीकडे जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर लस शोधण्यासाठी दिवसरात्र एक करत आहेत. या सगळ्यात एक देश असा आहे, ज्यानं इतिहास रचत कोरोनावर मात करून दाखवली आहे. हा देश आहे न्यूझीलंड.
न्यूझीलंड आपल्या देशातील सीमा बंद करत तीन महिन्यांत कोरोनाला हरवून देश कोरोनामुक्त झाल्याचं जाहीर केलं. आता न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही आहे. देशभरात एखाद्या सणासारखं उत्साहाचं वातावरण आहे. सोमवारी पहाटे न्यूझीलंडनं अखेरचा कोरोना रुग्ण निरोगी झाल्याचं जाहीर केलं. गेल्या 17 दिवसांत देशात एकही नवीन रुग्ण आढळून आला नव्हता. न्यूझीलंडमधील निरोगी झालेल्या या रुग्णाचे वय 50 वर्षांहून अधिक होते. ऑकलंडमध्ये राहणाऱ्या या महिलेत 48 तासांत कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
वाचा-लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोनाचा प्रसार होतो का? WHOचा नवा खुलासा
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डेने यांनी याबाबत घोषणा केली. तसेच, त्यांनी आनंदाच्या भरात डान्सही केल्याचं यावेळी सांगितले. तसेच, जेसिंडा यांनी यावेळी देशातील लॉकडाऊन हटवण्याबाबत तसेच काही प्रमाणात सूट देण्याबाबत घोषणा केली आणि न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याचं जाहीर केलं.
वाचा-कोरोनावर मात करतोय भारत , दिलासादायक आकडेवारी आली समोर
मुख्य म्हणजे न्यूझीलंडची लोकसंख्या 49 लाखांच्या आसपास आहे. मात्र पहिल्यापासूनच त्यांनी कडक नियम लावले. न्यूझीलंडमध्ये 28 फेब्रुवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर एकूण1504 कोरोनार रुग्ण सापडले.यातील 22 जणांचा मृत्यू झाला. मात्र मार्चपासून देशातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या. याशिवाय लॉकडाऊनच्या नियमांचेही काटेकोरपणे पालन करण्यात आले.
वाचा-COVID19: 30 सेकंद हा Mouthwash वापरा आणि कोरोनाला गुडबाय करा!
न्यूझीलंडचे डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ एशली ब्लूमफील्ड यांनी शेवटचा रुग्ण निरोगी झाल्यानंतर देशात एकही सक्रीय रुग्ण नसल्याचं जाहीर केलं. 28 फेब्रुवारीनंतर असं पहिल्यांदा घडलं आहे आणि ही उल्लेखनीय बाब आहे. असे असले तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
संकलन, संपादन-प्रियांका गावडे.