या देशात पोलिसांच्या पोशाखात हिजाबचा समावेश, 'अभिमानास्पद' वाटत असल्याची महिला पोलिसाची प्रतिक्रिया

पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये हिजाबचा (Hijab) समावेश करण्याचा निर्णय न्यूझीलंडमध्ये (New Zealand) घेण्यात आला आहे. जास्तीत जास्त मुस्लिम महिलांनी पोलीस सेवेत यावं यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.

पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये हिजाबचा (Hijab) समावेश करण्याचा निर्णय न्यूझीलंडमध्ये (New Zealand) घेण्यात आला आहे. जास्तीत जास्त मुस्लिम महिलांनी पोलीस सेवेत यावं यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.

  • Share this:
    वेलिंग्टन, 19 नोव्हेंबर: पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये हिजाबचा (Hijab) समावेश करण्याचा निर्णय न्यूझीलंडमध्ये (New Zealand) घेण्यात आला आहे. जास्तीत जास्त मुस्लिम महिलांनी पोलीस सेवेत यावं यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. या निर्णयानंतर कॉन्स्टेबल झिना अली (Zeena Ali) या हा हिजाब घालणाऱ्या पहिल्या महिला पोलीस ठरल्या आहेत. गेल्या वर्षी ख्राईस्टचर्चमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका मशिदीत 51 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुस्लिम बांधवाना मदत करण्यासाठी 30 वर्षीय झिना यांनी पोलीस सेवेत भरती होण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड हेराल्डच्या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात झिना यांनी पोलीस अधिकारी म्हणून पदोन्नती मिळवली असून हिजाब परिधान करणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत.  त्यांनी हा पोशाख तयार करण्यासाठी सुद्धा मदत केली होती, जो वापरताना धर्मानुसार आणि सेवा बजावत असताना अडथळा निर्माण करणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेचा मला खूप अभिमान असून हा पोशाख दाखवण्यास आणि घालण्यास मी खूप उत्सुक होते असंही त्यांनी यावेळी म्हटलं. (हे वाचा-PLI Scheme: मार्चपर्यंत 50 हजार लोकांना मिळू शकते नोकरी! वाचा काय आहे योजना) झिना पुढे म्हणाल्या की,  'माझ्या समाजाचं आणि महिलांचं प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सरकारच्या या निर्णयामुळे इतर मुस्लिम महिला पोलीस सेवेत दाखल होतील असा माझ्या विश्वास आहे. यापूर्वी महिला पोलीस होऊ शकतील असं समाजाला मान्य नव्हतं. परंतु आता या हिजाब पोशाखामुळे महिला पोलिसांना वेगळी ओळख मिळेल.' झिना यांना ज्या पद्धतीने पोलीस कॉलेजमध्ये आणि पोलीस सेवेत सन्मान देण्यात आला त्याबाबत त्यांनी आभार मानले. पोलीस कॉलेजमध्ये नमाज पढण्यासाठी खास खोली होती, असंही त्या म्हणाल्या. समाजातील स्त्रियांना पुढे येण्याची संधी मिळायला हवी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. झिना असं म्हणाल्या की, 'समाजातील स्त्रियांनी पुढे येण्याची गरज आहे. उंबरा ओलांडून पुढे येऊन स्त्रियांनी आपल्यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे.' (हे वाचा-पुढील वर्षात आ वासून उभं आहे नवं संकट; 2020 पेक्षाही महाभयंकर असणार 2021) 2008 मध्ये न्यूझीलंड पोलिसांनी आपल्या युनिफॉर्ममध्ये शिखांच्या पगडीचा समावेश केला होता. त्यावेळी पोलीसांमध्ये जगमोहन मल्ही हे पगडी घालणारे पहिले पोलीस अधिकारी ठरले होते. शीख धर्मियांची ती परंपरा असली तरीदेखील त्यांनी तोपर्यंत ऑनड्युटी पगडी परिधान केली नव्हती. 2006 मध्ये ब्रिटनमधील लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी यूनिफार्ममध्ये हिजाबला परवानगी दिली होती. त्यानंतर 2016 मध्ये स्कॉटलंड यार्डने देखील आपल्या युनिफॉर्ममध्ये हिजाबचा समावेश केला होता. तर बीबीसी रिपोर्टनुसार 2004 मध्ये ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया पोलीसमधील महा सुक्कर यांनी हिजाब परिधान केला होता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: