GREAT! न्यूझीलंडच्या पार्लमेंटमध्ये भारतीय भाषेचा आवाज; प्रियांका राधाकृष्णन मातृभाषेतून भाषण करतानाचा VIDEO VIRAL

GREAT! न्यूझीलंडच्या पार्लमेंटमध्ये भारतीय भाषेचा आवाज; प्रियांका राधाकृष्णन मातृभाषेतून भाषण करतानाचा VIDEO VIRAL

न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या पहिल्या भारतीय वंशाच्या व्यक्ती म्हणून प्रियांका रामकृष्णन यांचं कौतुक होत आहे. त्यांचा हा VIDEO VIRAL झाला आहे.

  • Share this:

वेलिंग्टन, 6 नोव्हेंबर : मातृभाषेचा अभिमानाच्या नुसत्या गप्पा मारणं वेगळं आणि प्रत्यक्ष दूर देशात राहूनही मातृभाषेचा अभिमान बाळगत तिचा वापर करणं ही बाब वेगळं. न्यूझीलंडच्या (New Zealand)मंत्रिपदी विराजमान झालेल्या पहिल्या भारतीय वंशाच्या राजकारणी म्हणून प्रियांका राधाकृष्णन(Priyanca Radhakrishnan) चर्चेत आहेत. न्यूझीलंडच्या नव्या मंत्रिमंडळाने गुरुवारी शपथ घेतली. त्या पार्श्वभूमीवर प्रियांका राधाकृष्णन यांचा पार्लमेंटमध्ये मल्याळीतून बोलतानाचा VIDEO VIRAL झाला आहे.

प्रियांका रामकृष्णन यांचा जन्म भारतातला. त्यानंतर त्या सिंगापूर राहिल्या आणि आता न्यूझीलंडच्या नागरिक आहेत. लेबर पार्टीच्या खासदार म्हणून त्या निवडून आल्या होत्या. आता तर पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न (jecinda ardern)यांच्या मंत्रिमंडळातही त्यांना स्थान मिळालं आहे. यांच्या भाषणाचा VIDEO आता खूपच शेअर होत आहे. मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतरचं पहिलं भाषण असं अनेक जण त्यावर लिहित असले, तरी हा ताजा व्हिडीओ नाही. 2017 मधला हा व्हिडीओ आहे. त्या वेळी प्रियांका पहिल्यांदा न्यूझीलंडच्या पार्लमेंटमध्ये लेबर पार्टीच्या सदस्य म्हूणून निवडून आल्या होत्या. त्या वेळी केलेल्या भाषणाची सुरुवात त्यांनी मल्याळीतून केली.  त्यानंतर तीन वर्षांनी त्यांची मंत्रिमंडळात निवड झाली आहे.

प्रियांका राधाकृष्णन असं त्यांचं नाव असून त्यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला होता. त्यांचं बालपण सिंगापूरमध्ये गेलं आणि शिक्षण न्यूझीलंडमध्ये झालं. त्यानंतर त्या तिथंच लग्न करून स्थायिक झाल्या. जन्म चेन्नईत झाला असला तरी त्यांचं  कुटुंब मूळचं केरळचं. आईवडिल सिंगापूरला स्थायिक झाल्यामुळे त्यांचं बालपण तिथेच गेलं. प्रियांका यांच्या वडिलांचं नाव माधवनपेरांबु रमण राधाकृष्णन तर आईचं नाव उषा आहे. केरळचं पेरावुर हे त्यांचं मूळ गाव असून, त्यांचे नातेवाईक हे चेन्नईमध्येच राहतात. त्यांचे आजोबा डाव्या विचारांच्या राजकारणाशी संबंधित होते.

प्रियांका यांचे आई वडील सिंगापूरला स्थायिक झाल्यामुळे त्यांचं बालपण तिथेच गेलं. सुरुवातीचं शिक्षण तिथं झाल्यानंतर त्या मास्टर डिग्री घेण्यासाठी न्यूझीलंडला गेल्या. या ठिकाणी त्या वेलिंग्टनमधील विद्यापीठामध्ये शिकत होत्या. "> 41 वर्षीय प्रियांका यांच्याकडे आता सामाजिक वैविध्य, सर्वसमावेशकता असं खातं दिलं आहे. (Minister for Diversity, Inclusion and Ethnic Communities)

"या पार्लमेंटमध्ये माझी मातृभाषा कदाचित पहिल्यांदा उच्चारली जात असेल, " असं म्हणत प्रियांका यांनी भाषणाची सुरुवात केली होती. आता तोच व्हिडीओ पुन्हा शेअर होत आहे.

मोठ्या बहुमताने न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा निवडून आलेल्या जेसिंडा आर्डर्न यांनी पंतप्रधानपदाची शपथ गुरुवारी घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांचाही शपथविधी झाला. सर्वांनी इंग्रजी आणि माओरी भाषेतून शपथ घेतली. जेसिंडा यांच्या मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांचा समावेश अधिक आहे. 20 पैकी 8 महिला मंत्री आहेत.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 6, 2020, 5:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading