31 डिसेंबर: जगात सर्वात पहिल्यांदा नववर्षाचं सेलिब्रेशन सुरू होतं ते न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात. ऑकलँड शहरात नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. शहरातल्या स्काय टॉवरवरून फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करण्यात आली आहे
328 मीटर उंच असलेल्या स्काय टॉवरवरून ही आतिषबाजी केली जाते. ही आतिषबाजी डोळ्यांचं पारणं फेडणारी होती. बारा वाजण्यासाठी काही क्षण राहिले असताना काऊंटडाऊन देण्यात आलं. जसे बारा वाजले त्या क्षणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ही आतिषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. एकमेकांना आलिंगन देऊन नागरिकांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. न्यूझीलंड पाठोपाठ आता ऑस्ट्रेलियामध्येही नवीन वर्षाचं स्वागत केलं गेलं आहे. एकेएक करत सर्वच देशांमध्ये नवं वर्षाचं स्वागत केलं जातं आहे.
भारतात नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही तास उरले आहेत. सर्वत्र उत्सुक्तेचं वातावरण आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा