वेलिंग्टन, 19 ऑगस्ट : लहान मुलांना खेळता खेळता नाकात, तोंडात, कानात काही ना काही टाकण्याची सवय असते. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करून या वस्तू बाहेर काढतात. मात्र न्यूझीलंडमधील (New Zealand) एका मुलाच्या बाबतीच वेगळंच घडलं आहे. त्याच्या नाकात अडकलेली वस्तू डॉक्टरांनाही सापडली नाही ती एका शिंकेने बाहेर आली. तीदेखील दोन वर्षांनंतर.
NZ Herald च्या वृत्तानुसार, न्यूझीलंडमधील सात वर्षांचा समीर 2018 साली पाच वर्षांचा असताना खेळता खेळता त्याने लेगो पीस (lego piece) आपल्या नाकात टाकलं. याबाबत त्याने पालकांनाही सांगितलं. समीरच्या पालकांनी त्याच्या नाकात लेगो पीस शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना काही सापडलं नाही. त्यानंतर ते त्याला तात्काळ डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनादेखील त्याच्या नाकात काहीच दिसलं नाही. मग त्यांनी समीरच्या अन्ननलिकेतून ही पीस गेला असावा असं सांगितलं.
समीरचे वडील अन्वर म्हणाले, "समीरने आम्हाला लेगो पीस नाकात टाकल्याचं सांगितलं, त्यानंतर आम्ही त्याच्या नाकातून तो पीस काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. आम्ही त्याला डॉक्टरकडेही नेलं. मात्र डॉक्टरांना ते सापडलं नाही. डॉक्टरांनी हा तुकडा त्याच्या पचनमार्गातून गेलं असावं असं सांगितलं, यानंतर समीरला कधीच कोणता त्रास झाला नाही किंवा कोणती समस्या उद्भवली नाही"
हे वाचा - 8 वर्षांच्या दिव्यांग मुलीनं केलं जिमनॅस्टीक; VIDEO पाहून भलेभलेही ही झाले थक्क
यानंतर समीरला नाकात कधीच वेदना जाणवल्या नाहीत. त्याला श्वास घ्यायलाही त्रास झाली नाही. कोणतीही समस्या उद्भवत नसल्याने त्याचे पालकही या गोष्टीला विसरून गेले. मात्र तीन दिवसांपूर्वीच समीर कपकेक खात होता. खाण्याआधी त्याने कपकेकचा सुगंध घेतला आणि त्याच्या नाकात वेदना जाणवू लागल्या.
समीरच्या नाकात कपकेकचा काही भाग गेला असावा असं त्याच्या पालकांना वाटलं आणि ते बाहेर येण्यासाठी त्याचे पालक त्याला शिंक येण्यासाठी प्रयत्न करू लागले. जेणेकरून ते बाहेर येईल. नाकावर दाब देऊन खूप प्रयत्न केल्यानंतर समीरला अखेर मोठी शिंक आली आणि या शिंकेतून जे काही बाहेर आलं ते पाहून समीर स्तब्धच झाला.
हे वाचा - झूमवर पालिकेची मीटिंग सुरू असताना कॅमेरा राहिला ऑन, SEX करताना दिसलं कपल आणि...
अन्वर यांनी सांगितलं, "समीर तो लेगो पीस पुन्हा पाहून स्तब्धच झाला, तो डोळे मोठे करून त्याकडे पाहू लागला. त्यानंतर तो मोठ्याने आई मला माझं लेगो सापडलं म्हणून ओरडला. तुम्ही मला सांगितलं होतं, ते खेळणं नाकात नाही मात्र ते तिथंच होतं"