OMG! ज्युरासिक वर्ल्डमधील डायनासॉरच्या T-Rex Fossil ची तब्बल 2,33,20,49,820 कोटी रुपयांमध्ये विक्री

OMG! ज्युरासिक वर्ल्डमधील डायनासॉरच्या T-Rex Fossil ची तब्बल 2,33,20,49,820 कोटी रुपयांमध्ये विक्री

ज्युरासिक वर्ल्डमधील डायनासॉरच्या T-Rex Fossil विक्रमी किमतीत विकण्यात आले आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या लिलावात या T-Rex Fossil ला विक्रमी किंमत मिळाली आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 07 ऑक्टोबर : ज्युरासिक वर्ल्डमधील डायनासॉरच्या T-Rex Fossil विक्रमी किमतीत विकण्यात आले आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या लिलावात या T-Rex Fossil ला विक्रमी किंमत मिळाली आहे. मागील लिलावाच्या अनेकपट ही रक्कम असून 31.8 मिलियन डॉलर म्हणजेच 2,33,20,49,820 कोटी रुपये इतकी किंमत या जीवाश्मांना मिळाली आहे. आतापर्यंत लिलावात मिळालेली ही सर्वाधिक रक्कम असून  लिलावात या फॉसिलची सुरुवातीची किंमत सहा ते आठ मिलियन डॉलर ठेवण्यात आली होती. त्यानंतर लिलावात यावर मोठी रक्कम लावून हे विकत घेण्यात आले. न्यूयॉर्कमध्ये हा लिलाव आयोजित करण्यात आला होता. पण हॉंगकॉंग आणि लंडनमधून  देखील यामध्ये सहभाग नोंदवण्यात आला होता. अखेर Christie's या संस्थेने ही मोठी रक्कम मोजत हे फॉसिल विकत घेतले.

याआधी सर्वात मोठी रक्कम ही लिलावात Sue नावाच्या Specimen ला मिळाली होती. ऑक्टोबर 1997 मध्ये शिकागोच्या  Field Museum of Natural History मध्ये 8.4 मिलियन डॉलर इतकी रक्कम मिळाली होती. जगभरात आतापर्यंत केवळ 50 Tyrannosaurus fossils आढळून आले आहेत. 1902 मध्ये पहिला फॉसिल आढळून आला होता.

(हे वाचा-बँकेत तुम्ही असा व्यवहार केला आहे का? मिळू शकते Income Tax विभागाची नोटीस)

31.8 मिलियन डॉलर मध्ये विकण्यात आलेल्या या फॉसिलला स्टॅन असे नाव देण्यात आलं असून 13 फूट उंच आणि 40 फूट याची लांबी आहे. 1987 मध्ये दक्षिण डकोटा मध्ये हे फॉसिल सापडले होते. यामध्ये याच्या कवटीवर आणि मानेवर असलेल्या खुणांमुळं त्याच्याबरोबरच्या T-Rexes या डायनासॉरशी भांडण झाल्याचे पुरावे मिळत असल्याचं संशोधकांनी सांगितलं. त्याचबरोबर 67 लाख वर्षांपूर्वी  त्याचं वजन 8 टन असेल असा अंदाज देखील त्यांनी बांधला आहे. त्यामुळं जर खासगी जागेत हे फॉसिल सापडले असेल तर याचा लिलाव करता येऊ शकतो. त्यामुळे या फॉसिलचा लिलाव  झाला.

(हे वाचा-Gold Price Today- 2500 रुपयांनी उतरली चांदी, सोन्याच्या दरातही मोठी घसरण)

दक्षिण डकोटामधील Black Hills Institute of Geological Research मधील Paleontologists नी यावर 30 हजार तास काम करून 188 हाडं बसवून हे सांगाडा तयार केला आहे. हा सांगाडा खरेदी करण्यासाठी लिलावात मोठी चढाओढ पाहायला मिळाली होती. लिलावाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटांत याची रक्कम 9 मिलियन डॉलर अर्थात 66,00,14,100 कोटी रुपयांवर गेली होती. त्यानंतर 14 मिनिटांनी या लिलावात केवळ 3 जण शिल्लक होते. त्यामुळे अखेर 27.5 मिलियन डॉलर म्हणजेच 2,01,60,11250 कोटी रुपये या रकमेवर हा लिलाव थांबला. त्याचबरोबर इतर टॅक्स आणि कमिशन मिळून याची रक्कम 31.8 मिलियन डॉलर म्हणजेच 2,33,20,49,820 कोटी रुपये इतकी झाली.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 7, 2020, 3:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या