मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

न्यूयॉर्कमध्ये इडा चक्रिवादळाचा हाहाकार, 49 जणांचा मृत्यू; सबवे सेवा बंद

न्यूयॉर्कमध्ये इडा चक्रिवादळाचा हाहाकार, 49 जणांचा मृत्यू; सबवे सेवा बंद

New York City flood:  इडा चक्रीवादळामुळे (Hurricane Ida) अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात जोरदार पाऊस झाला.

  • Published by:  Pooja Vichare

न्यूयॉर्क, 03 सप्टेंबर: इडा चक्रीवादळ (Storm Ida)आणि अमेरिकेत भीषण रूप धारण करत आहे. बुधवारी, इडा चक्रीवादळामुळे (Hurricane Ida) अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात (New York City) जोरदार पाऊस झाला. या चक्रिवादळामुळे न्यूयॉर्कमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. (New York City flooding Live updates)

या भागात आलेल्या पुरात जवळपास 49 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. तर अनेक घरात पुराचं पाणी घुसलं आहे.

या चक्रिवादळामुळे अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये विक्रमी पाऊस झाला आहे. इडा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री उशिरा न्यूयॉर्क शहर आणि उर्वरित भागात एका रात्रीसाठी आणीबाणी घोषित केली होती. तसंच सबवे स्टेशन आणि ट्रॅक पूराच्या पाण्याखाली आले आहेत. त्यामुळे महानगर परिवहन प्राधिकरणाने सर्व सेवा निलंबित केल्या.

IND vs AUS : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात त्रस्त, क्वारंटाईन सेंटरमध्ये खेळाडूंचे हाल! 

वादळामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. बस आणि ट्रेन बंद आहेत. प्रशासनानं लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.

तसंच अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. ला गार्डिया आणि जेएफके विमानतळ तसंच नेवार्क विमानतळावरून अनेक उड्डाणे रद्द केली. विमानतळाचे टर्मिनल पावसाच्या पाण्यानं भरल्याची माहितीही समोर आली आहे.

First published:

Tags: Rain