प्लेट फोडून,फर्निचर फेकून 'या' देशांमध्ये करतात नवं वर्षाचं स्वागत

प्लेट फोडून,फर्निचर फेकून 'या' देशांमध्ये करतात नवं वर्षाचं स्वागत

कुठे प्लेट फोडून तर कुठे घंटी वाजवून न्यू इयरचं स्वागत करतात. तर चला या सगळ्या विविध देशांमधील प्रथा जाणून घेऊया.

  • Share this:

31 डिसेंबर:   2017चं वर्ष संपतं आहे. तर सगळ्याच जगात नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं आहे.  पण काही देशांमध्ये  न्यूइयरचं स्वागत अत्यंत वेगळ्या पद्धतीने केलं जातं. कुठे प्लेट फोडून तर कुठे घंटी वाजवून न्यू इयरचं स्वागत करतात. तर चला या सगळ्या विविध देशांमधील प्रथा जाणून घेऊया.

डेनमार्क 

तसं तर शेजारच्या दारांवर प्लेट्स फोडल्या तर तुम्ही संकटाला आमंत्रण देऊ शकता. पण डेनमार्कमध्ये नवीन वर्षांचं स्वागत अशाचप्रकारे केलं जातं. शेजारच्यांच्या घरी जाऊन त्यांच्या दारावर प्लेट्स फोडल्या जातात. हा एक  शुभसंकेत समजला जातो.

स्वित्झरलॅंड 

जर एखाद्या पार्टीला गेले असता आईस्क्रीम केक फरशीवर पडला तर वातावरण बिघडतं. लोकांना ते आवडत नाही. पण स्वित्झरलॅंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करताना आईस्क्रीम जमिनीवर सांडूनच स्वागत केलं जातं. असं केल्याने घरात समृद्धी येते नवीन  वर्ष सुखात जातं अशी मान्यता आहे.

साऊथ आफ्रिका 

जर 31 डिसेंबरच्या मध्यरात्री तुम्ही जोहांसबर्ग शहराच्या रस्त्यावर चालत असाल तर जरा सांभाळून!कुठून एखादी खुर्ची टेबल तुमच्या डोक्यावर पडू शकतं. कारण जुन्या खिडक्या आणि फर्निचर बाहेर फेकून नवीव वर्षाचं स्वागत इथे केलं जातं. इथली ही परंतपरा जगप्रसिद्ध आहे.

जपान

जपानमध्ये बुद्ध धर्माच्या परंपरानुसार नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. इथे 108 वेळा घंटी वाजवली जाते. असं केल्याने आपले जुने पाप माफ होतात अशी मान्यता आहे.  यामुळे नवीन वर्षाचं स्वागत शुद्ध होऊन  आपण करतो.

चिली

चिलीच्या तालकामध्ये लोक नवीव वर्षाचं स्वागत अत्यंत वेगळ्या पद्धतीने  करतात. इथे लोक दफनभूमीवर जाऊन  साजरं करतात ,स्मशानात आपल्या पुर्वजांच्या कबरीवर जाऊन नवीन वर्षांचं स्वागत केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे.

मेक्सिको-मेक्सिकोत नवीन वर्षांचं स्वागत सगळ्यात वेगळ्या पद्धतीने होतं. इथे नवीन वर्षाचं स्वागत वेगवेगळ्या रंगांचे अंडरवेअर घालून करतात . प्रत्येक रंगाचा एक वेगळा अर्थ आहे अशी मान्यता आहे. लाल रंगांचे अंडरवेअर घातले तर तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळते अशी मान्यता आहे.

बेलारूस 

या देशात लग्न न झालेल्या मुलींसमोर मक्याचा दाणा ठेवला जातो. मग त्यांच्यासमोर कोंबडा सोडला जाताो. मग हा कोंबडा जिच्यासमोरचा दाणा उचलेल  तिचं लग्न सगळ्यात लवकर होईल अशी मान्यता आहे.

 

तर अशाप्रकारे वेगवेगळ्या देशांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2017 05:15 PM IST

ताज्या बातम्या