जगभर नवीन वर्षाच्या स्वागताची धूम

जगभर नवीन वर्षाच्या स्वागताची धूम

सगळीकडेच नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह आहे. काही देशांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं आहे.

  • Share this:

31 डिसेंबर : नवीन वर्ष सुरू होण्यास आता अवघे काही तास उरले आहेत. अशावेळी जगभरातच नवीन वर्षाच्या स्वागताची धूम दिसते आहे. सगळीकडेच नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह आहे. काही देशांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं आहे.

सगळ्यात पहिले न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. शहरातल्या स्काय टॉवरवरून फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करण्यात आली.328 मीटर उंच असलेल्या स्काय टॉवरवरून ही आतषबाजी केली जाते. ही आतषबाजी डोळ्यांचं पारणं फेडणारी होती. बारा वाजण्यासाठी काही क्षण सुरु असताना काऊंटडाऊन देण्यात आलं. जसे बारा वाजले त्या क्षणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ही आतिषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. एकमेकांना आलिंगन देऊन नागरिकांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.

त्यानंतर नवीन वर्षाचं स्वागत करणारा  ऑस्ट्रेलिया  हा दुसरा देश ठरला आहे. सिडनीमध्ये प्रचंड आतिषबाजी करून नवीन वर्षाचं  स्वागत करण्यात आलं. दरवर्षी या फटाक्यांच्या आतषबाजीसाठी एक विशिष्ट थिम घेतली जाते. यावर्षी समलिंगी विवाह या थीमवर सिडनीमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येतंय

हॉंगकाँगकाँगमध्येही नववर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. हाँगकाँगच्या बंदरावर नयनरम्य आतिषबाजी पाहायला मिळाली. ही आतिषबाजी पाहण्यासाठी एकच गर्दी करण्यात आली होती. किम जोंगचा देश म्हण जेच उत्तर कोरियातही नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. तर दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या  सेऊलमध्येही नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. दक्षिण कोरियातल्या नागरिकांना नव्या वर्षाचं स्वागत करताना आसमंत उजळून टाकणारी आतिषबाजी पाहायला मिळाली.

जपानमध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीनं नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. जपानमध्ये नववर्षाचं काऊंटडाऊन संपताच आकाशात फुगे सोडण्यात आले.

Loading...

भारतातही  न्यूइयरच्या स्वागताचा जल्लोष दिसतो आहे.   गोव्यातील  पणजी शहरात मांडोवी नदीत अनेक फ्लोटिंग कसिनो अनेक वर्षांपासून आहेत.  तिथल्या कसिनो प्राईडमध्ये थर्टी फर्स्टची तयारी पूर्ण झालीये. अनेक लोकांचं न्यूईयर सेलिब्रेशन तर सुरूही झालंय. तर मुंंबई  दिल्ली कोलकत्यातही न्यू इयरच्या स्वागताचा जल्लोष दिसतो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2017 10:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...