या लोकांमुळेही करोना पसरण्याचा धोका, अमेरिकन शास्त्रज्ञांचा धक्कादायक निष्कर्ष

या लोकांमुळेही करोना पसरण्याचा धोका, अमेरिकन शास्त्रज्ञांचा धक्कादायक निष्कर्ष

आशियाई देशांमध्ये सगळेच लोक मास्क वापरतात हेच फायद्याचं ठरलं असंही या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क 1 एप्रिल : सर्वच देशांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर जगभर संशोधन सुरू आहे. काही देशांमध्ये कोरोनावर लस शोधल्याचा दावाही केला जातोय. मात्र त्याच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी आता आकडेवारींच्या आधारी काही नवे निष्कर्ष काढले आहेत. हे निष्कर्ष धक्कादायक आहे. त्यांच्या मते 25 टक्के लोकांमध्ये COVID 19  हा व्हायरस असला तरी त्याची लक्षणं दिसत नाही. मात्र असे लोक कोरोनाचे वाहक ठरू शकतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होण्याची शक्यता असते. त्यामुळे सगळ्यांनीच मास्क वापरणं योग्य राहिल असं दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे. याबाबतचं वृत्त CNNने दिलं आहे.

सुरूवातीला WHO आणि अनेक अमेरिकन्स संशोधन संस्थांनी प्रत्येकानेच मास्क वापरण्याची गरज नाही असं म्हटलं होतं. ज्यांना काही लक्षणं दिसतात त्यांनीच मास्क वापरला पाहिजे. मास्क वापरण्याची पहिली गरज ही रूग्ण आणि फिल्डवर काम करणारे डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी आहेत असं त्यांचं मत होतं. मात्र आता नव्या आकडेवारींचा आणि काही पुराव्यांचा अभ्यास केल्यावर त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.

आशियाई देशांमध्ये सगळेच लोक मास्क वापरतात हेच फायद्याचं ठरलं असंही या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

अमेरिकेसाठी धोक्याची घंटा, ऑगस्टपर्यंत मृतांचा आकडा जावू शकतो 82,000वर

कोरोनाव्हायरसने जगभर थैमान घातलंय. सोशल मीडिया असो की टी.व्ही. सगळीकडे फक्त चर्चा आहे ती कोरोनाव्हायरसची. सगळं जग आज तोंडावर मास्क लावून फिरतं आहे. 180 पेक्षा जास्त देशांमध्ये याने विळखा घातलाय. मात्र एका देशाने मात्र चक्क कोरोनाव्हायरस हा शब्दच उच्चारण्यावर बंदी घातली आहे. एवढच नाही तर मास्क लावण्यावरही बंदी घातलीय. असं करताना कोणी आढळलं तर त्याला सरळ तुरूंगात टाकण्याचा आदेशच देण्यात आला आहे.

VIDEO कोरोनामुळे घरात बंद असताना प्रेयसीला भेटण्यासाठी तरूणाची भन्नाट शक्कल

हा देश आहे तुर्कमेनिस्तान. तुर्कमेनिस्तानमध्ये कोरोनाचा एकही रूग्ण नाही असा तिथल्या सरकारचा दावा आहे. जगभर काहीही असलं तरी त्याचा देशातल्या लोकांनी परिणाम होऊ देऊ नये. असं सरकारने म्हटलं आहे. त्याचबरोबर कुणी मास्कही लावायचा नाही अशी तंबीही दिलीय.

मास्क लावण्यामुळे भीती वाढते असं त्यांना वाटत आहे. कोरोनव्हायरस विषयी कुणी चर्चा करत असेल तर पोलीस त्यांना अटक करू शकतात.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2020 11:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading