Home /News /videsh /

अमेरिकेचा इराणवर आणखी एक हल्ला, 6 जण ठार

अमेरिकेचा इराणवर आणखी एक हल्ला, 6 जण ठार

इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानी याला रॉकेट हल्ल्यात ठार केलं. यानंतर पुन्हा शनिवारी अमेरिकेने हवाई हल्ला केला आहे.

    बगदाद, 04 जानेवारी : अमेरिकेने गुरुवारी रात्री इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानी याला रॉकेट हल्ल्यात ठार केलं. यानंतर पुन्हा शनिवारी अमेरिकेने हवाई हल्ला केला आहे. यात 6 जण ठार झाले असून तीन लोक गंभीर जखमी झाले आहेत. ठार झासलेले लोक इराण समर्थक मिलिशिया हश्द अल शाबीचे असल्याचं सांगितलं जात आहे. हा हल्ला बगदादमधील ताजी भागात झाल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मिलिशियाच्या तीनपैकी दोन वाहने जळून खाक झाली. हवाई हल्ल्यात या वाहनांमध्ये असलेले 6 लोक ठार झाले. स्थानिक वेळेनुसार हा हल्ला रात्री 1 वाजून 12 मिनिटांनी झाला. यामध्ये पॉप्युलर मोबलायझेशन फोर्सेसच्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. अमेरिकेने गुरुवारी रॉकेट हल्ला करून कुद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी याला ठार केलं होतं. सुलेमानी त्याच्या फौजेसह बगदाद एअरपोर्टकडे जात होता नेमका त्याच वेळी अमेरिकेनं हवाई हल्ला केला. यात सुलेमानी ठार झाला. त्याच्याशिवाय या हल्ल्यामध्ये पॉप्युलर मोबलायझेशन फोर्सचा डेप्युटी कमांडर अबू महदी अल मुहांदिस हासुद्धा ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. सुलेमानी पश्चिम आशियात इराणी कारवायांमागचा सूत्रधार मानला जातो. त्याने सिरियामध्ये जाळं पसरवलं होतं तसंच इस्रायलमध्ये रॉकेट हल्ला करण्याचाही आरोप त्याच्यावर होता. अमेरिका त्याच्या मागावर होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड़ ट्रम्प यांनी सुलेमानी ठार झाल्यानंतर काही वेळातच अमेरिकेच्या झेंड्याचा फोटो ट्विट केला होता. गेल्या वर्षीपासून इराण-अमेरिका संघर्ष वाढला होता. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध घातले आहेत. मेजर सुलेमान 10 सेंकदात झाला ठार , 24 तासानंतर बाहेर आला थरारक VIDEO
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Iran

    पुढील बातम्या