मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अफगाणिस्तानात आता विचित्र तालिबानी नियम; या गोष्टीसाठीही घ्यावी लागणार परवानगी

अफगाणिस्तानात आता विचित्र तालिबानी नियम; या गोष्टीसाठीही घ्यावी लागणार परवानगी

नवीन नियमांनुसार (Taliban Rule), कोणत्याही विरोध प्रदर्शनासाठी न्याय मंत्रालयाकडून परवानगी घ्यावी लागेल. यासह, निषेधाचा उद्देश, घोषणा, ठिकाण, वेळ आणि प्रदर्शनाशी संबंधित प्रत्येक गोष्ट सुरक्षा यंत्रणांना सांगावी लागेल.

  • Published by:  Kiran Pharate

काबूल 09 सप्टेंबर : अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर (Taliban Regains Control of Afghanistan) तालिबाननं सरकारही (Taliban Government) स्थापन केलं आहे. मात्र, तालिबानला होणारा विरोधही वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर आता तालिबान सरकारच्या गृहमंत्रालयानं (Home Ministry) विरोध प्रदर्शनाबाबत नवे नियम बनवले (Taliban Rule) आहेत. यानुसार, कोणतंही विरोध प्रदर्शन करण्याच्या 24 तास आधीच त्याची माहिती द्यावी लागेल.

सलाम! बंदूक रोखणाऱ्या तालिबानीला निर्भयपणे सामोरी गेली रणरागिणी, PHOTO VIRAL

नवीन नियमांनुसार, कोणत्याही विरोध प्रदर्शनासाठी न्याय मंत्रालयाकडून परवानगी घ्यावी लागेल. यासह, निषेधाचा उद्देश, घोषणा, ठिकाण, वेळ आणि प्रदर्शनाशी संबंधित प्रत्येक गोष्ट सुरक्षा यंत्रणांना सांगावी लागेल. सोबतच या विरोध प्रदर्शनाची माहिती देखील सुरक्षा यंत्रणांना 24 तास अगोदर द्यावी लागेल. जर हे केलं नाही तर उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

अफगाणिनस्तान मोठी घडामोड: अमेरिकेच्या CIA प्रमुखांनी घेतली अजित डोवाल यांची भेट

तालिबानची  राजवट (Taliban Rule in Afghanistan)  आल्यानंतर सर्वाधिक अत्याचार हे महिलांवर होत आहेत. त्यांच्यावर घराच्या बाहेर पडण्यापासून ते शिक्षण आणि नोकरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तालिबान राजवटीच्या विरोधात काबूलमध्ये शेकडो नागिरांनी निदर्शनं केली. या निदर्शनात महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. हेच पाहता तालिबाननं आता नवा नियम जाहीर केला आहे.

अफगाणिस्तानच्या गृहमंत्र्याची माहिती द्या आणि कमवा 50 लाख डॉलर: अमेरिका

सोमवारीच स्थापन झालं तालिबानी सरकार -

तालिबाननं सोमवारीच अफगाणिस्तानातील आपल्या सरकार स्थापनेची घोषणा केली आहे. मुल्ला मुहम्मद हसन अखुंदला अफगाणिस्तानचा पंतप्रधान बनवलं गेलं आहे. यासोबतच मुल्ला बरादर आणि अब्दुल सलाम हनफी या दोघांना उपपंतप्रधान करण्यात आलं आहे. यासोबतच हक्कानी नेटवर्क सुरू करणाऱ्या जलालुद्दीनचा मुलगा सिराजुद्दीन हक्कानीला गृहमंत्री करण्यात आले आहे. तर, आमिर खान मुताक्कीला परराष्ट्र मंत्री आणि मुल्ला याकूबला संरक्षण मंत्री करण्यात आले आहे.

First published:

Tags: Afghanistan, Taliban