Home /News /videsh /

जगातलं सर्वात स्वस्त Weapon, 250 रुपयात उद्धवस्त होणार शत्रूचं मिसाईल

जगातलं सर्वात स्वस्त Weapon, 250 रुपयात उद्धवस्त होणार शत्रूचं मिसाईल

आयर्न डोमपासून (Iron Dome) ते अगदी घातक ड्रोन तयार करणाऱ्या इस्रायलनं जगभरात पहिल्यांदाच लेजर मिसाईल डिफेन्स सिस्टीमची (Lesar Missile Defense System) यशस्वी चाचणी केली आहे.

तेल अवीव, 15 एप्रिल: इस्रायल (Israel) त्यांच्याकडच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी जगभरात ओळखला जातो. आताही आयर्न डोमपासून (Iron Dome) ते अगदी घातक ड्रोन तयार करणाऱ्या इस्रायलनं जगभरात पहिल्यांदाच लेजर मिसाईल डिफेन्स सिस्टीमची (Lesar Missile Defense System) यशस्वी चाचणी केली आहे. या मिसाईल डिफेन्स सिस्टीमला ‘आयर्न बीम’हे नाव देण्यात आलं आहे. या लेझरवर आधारित डिफेन्स सिस्टीमनं मोर्टार (उखळी तोफा), रॉकेट आणि अँटिटँक मिसाईल्स एकाच फटक्यात उध्वस्त केली. हे आयर्न डोम अत्यंत यशस्वी झाल्याचा आणि त्यानं 90 टक्के रॉकेट हल्ल्यांना प्रतिकार केल्याचा इस्रायलचा दावा आहे. अर्थात ही प्रणाली अत्यंत महाग, खर्चिक असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. गाझा पट्टीतून कुणीही अगदी थोडेसे डॉलर्स खर्च करून आमच्यावर रॉकेट हल्ला करु शकतं. पण त्याला आयर्न डोममधून प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हाला मात्र हजारो डॉलर्स खर्च करावे लागतात, असं इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी म्हटलं आहे. या नव्या सिस्टीमनं रॉकेट, मोर्टार आणि ड्रोनला कसं उध्वस्त केलं याचा एक व्हिडिओ इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयानं (Isreal Defense Ministry) प्रसिद्ध केला आहे. जमिनीवर तैनात असलेल्या एका सिस्टीममधून एक लेजर बीम निघते हवेतील लक्ष्याला नष्ट करते असं या व्हिडिओत दिसतं. अर्थात, हा व्हिडिओ बराच एडिट करण्यात आला आहे. आयर्न डोम कसं काम करतं ते पाहू -आयर्न डोम ही एक मोबाईल वायू संरक्षण प्रणाली (Mobile Air Defence System) आहे. -इस्रायलच्या सरकारी सुरक्षा एजन्सी ‘राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीम’ने (Rafel Advanced Defense System) ही यंत्रणा विकसित केली आहे. -याला मिसाईल संरक्षण बॅटरी (Missile Defence Battery) असंही म्हटलं जातं. संपूर्ण इस्रायलमध्ये अशा प्रकारच्या सात मिसाईल संरक्षण बॅटरी लावण्यात आल्या आहेत. -इंटरसेप्ट मिसाईल क्षमतेपेक्षा ही बॅटरी जरा कमी क्षमतेची आहे. सिक्युर्ड वायरलेस कनेक्शनद्वारे हे ऑपरेट केली जाते. -आयर्न डोममध्ये एक रडार युनिट, मिसाईल कंट्रोल युनिट आणि अनेक लाँचर्स यांचा समावेश आहे. - ही प्रणाली कोणत्याही ऋतुत काम करण्यासाठी सक्षम आहे. आयर्न डोममधून निघालेलं अँटिमिसाईल 70 किमीच्या परिघात असलेल्या हमासच्या रॉकेटला हवेतच उध्वस्त करतं. -सगळ्यांत आधी आयर्न डोम सिस्टीम रॉकेटला ओळखतं. -त्यानंतर रेंज आणि निशाण्यावर लावलेल्या परिसराच्या दिशेची तपासणी केली जाते. त्यानंतर वॉर्निंग सायरन वाजवला जातो. सुरक्षित स्थळी जाण्यासाठी स्थानिक लोकांकडे सायरन वाजल्यानंतर 30 ते 90 सेकंदांचा वेळ असतो. त्यानंतर नुकसान किती होईल याचा अंदाज घेतला जातो आणि आयर्न डोम ऑपरेटर्सकडून काऊंटर मिसाईल लाँच केली जातात आणि अशा प्रकारे रॉकेट हवेतच नष्ट केलं जातं. इस्रायलवर सतत युद्धाचे ढग घोंघावर असतात. 2006 मध्ये इस्रायल- लेबेनॉनच्या युद्धादरम्यान 4000 रॉकेट उत्तर इस्रायलवर डागण्यात आली होती. तर 2000 आणि 2007 मध्ये गाझाच्या दिशेनं दक्षिण इस्रायलवरही 4000 रॉकेट हल्ले करण्यात आले होते. सतत होत असलेल्या या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी म्हणून इस्रायलनं हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विचार केला. यामध्ये रॉकेट हल्ला कुठून होत आहे हे लक्षात घेऊन तो आधीच नष्ट केला जातो. महत्त्वाचं म्हणजे यामुळे नुकसान कमी होऊ शकेल अशा इस्रायली लष्कराचा दावा आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Israel

पुढील बातम्या