नवी दिल्ली : शहरी असो ग्रामीण भाग सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठीची स्वच्छतागृहं (Toilets) फारच कमी प्रमाणात असतात. जी काही असतात तीदेखील फारशी स्वच्छ असतातच असं नाही. त्यामुळं महिलांना (Women) त्रास सहन करावा लागतो. अस्वच्छतेमुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न (Health Issues) निर्माण होतो. यावर ब्रिटनमधील युवा विद्यार्थांनी संशोधन करून नाविन्यपूर्ण लेडीज टॉयलेट (Ladies Toilet) डिझाइन केलं आहे. यामुळे महिलांना योग्य सुविधा मिळतील आणि त्यांचे आरोग्यही चांगले राहिल असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.
झी न्यूज हिंदीच्या वृत्तानुसार, ब्रिटनमधील (UK) दोन विद्यार्थ्यांनी हे अनोखे लेडीज टॉयलेट डिझाइन केले आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील मास्टर्स प्रोजेक्टव्दारे (Master Project) महिलांच्या या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला असून, त्यांचा हा प्रकल्प यशस्वी झाला आहे. एम्बर प्रोबिन आणि हेजल मॅकशेन अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे लेडीज टॉयलेट पूर्णतः स्पर्श विरहीत म्हणजेच हँडस फ्री असून, पारंपारिक टॉयलेटच्या तुलनेत ते 6 पट अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि उपयुक्त असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
संशोधनात आढळून आले तथ्य
याबाबत माहिती देताना एम्बर प्रोबिन आणि हेजल मॅकशेन यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी पुरुषांच्या तुलनेत महिलांकरिता कमी प्रमाणात स्वच्छतागृहे उपलब्ध असतात. त्यामुळे स्वच्छतागृहासाठी असलेली महिलांची रांग ही पुरुषांच्या रांगेच्या तुलनेत 34 पट अधिक लांब असते. कारण सरासरी पुरुषांच्या 10 सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या तुलनेत महिलांसाठी केवळ एकच युरिनल (Urinal) उपलब्ध असते. त्यामुळे महिलांना नाईलाजानं स्वच्छतेकडं दुर्लक्ष करून त्याचा वापर करावा लागतो त्यामुळं त्यांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता अधिक असते. त्यातच मासिकपाळी (Periods) दरम्यान त्यांना सार्वजनिक स्वच्छतागृहात अधिक वेळ लागतो. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. अशा सर्व सुक्ष्म बाबींचा विचार आम्ही हे स्वच्छतागृह बनवताना केला आहे.
Mask च्या आगळ्यावेगळ्या डिझाईनमुळे TikToker प्रसिद्धीझोतात, पाहा VIDEO
म्युझिक फेस्टची छायाचित्रे पाहताना सुचली कल्पना
डेली मेलमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शहरातील एका म्युझिक फेस्टचे (Music Fest) फोटो पाहताना त्यांना ही कल्पना सुचली. या ठिकाणी हजारो महिला भेट देतात पण त्यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात चांगल्या स्वच्छतागृहांची सोय नाही.
वेळेची होते बचत
एम्बर प्रोबिन आणि हेजल मॅकशेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉक होत असलेल्या स्वच्छतागृहांमध्ये असाही जास्त वेळ लागतो. तसेच या स्वच्छतागृहांचे दरवाजे उघडताना किंवा बंद करताना महिलांच्या हाताला विषाणू लागू शकतात. या पार्श्वभूमीवर हे ओपन प्रोटोटाइप (Open Prototype) स्वच्छतागृह अधिक सुरक्षित आहे. यामुळे बाहेरुन महिला किंवा पुरुषांच्या शरीराचा केवळ वरील भाग दिसतो. या स्वच्छतागृहाच्या अजून काही चाचण्या घेतल्या जात आहेत. स्वच्छतागृहांच्या रचनेबाबत आम्ही कोणताही क्रांतीकारी बदल केलेला नाही. महिलांसाठी कधीही आणि कुठेही स्वच्छतागृह उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं आम्ही हे फास्टट्रॅकच्या धर्तीवर स्वच्छतागृह तयार केलं आहे,असं प्रोबिन आणि मॅकशेन यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Woman