पोपटासारखी चोच आणि दोन बोटं असणारा डायनासोर तुम्ही कधी पाहिलाय का?

पोपटासारखी चोच आणि दोन बोटं असणारा डायनासोर तुम्ही कधी पाहिलाय का?

मंगोलियामधील गोबी वाळवंटात डायनासॉरच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे.

  • Share this:

मुंबई, 09 ऑक्टोबर : आतापर्यंत जगभरात डायनासॉरच्या विविध प्रजाती सापडल्या आहेत. डायनासोर हा खूप भयंकर आणि भीतीदायक प्राणी होता अशी आपली धारणा होती. पण वर्षानुवर्षे झालेल्या अभ्यासामुळं, खोदकामामुळं, ऐतिहासिक आणि भौगोलिक माहितीमुळं डायनासोर हा खूप वैविध्य असणारा प्राणी असल्याचं समोर आलं आहे. इतर सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणेच डायनासॉरच्या देखील विविध प्रजाती असल्याचं समोर आलं आहे.

आता मंगोलियामधील गोबी वाळवंटात डायनासॉरच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. यामध्ये या डायनॅसोरला दोन बोटं असल्याचं आणि दात नसल्याचं समोर आलं. अनेकवेळा आपल्याला काही गोष्टीची माहिती नसते. मात्र अशा खोदकामांमुळं आणि ऐतिहासिक गोष्टींमुळे विविध प्रकारची माहिती मिळते. 68 मिलियन वर्षांपूर्वीचं हे सांगाडे असून अनेक सांगाडे या खोदकामात सापडले आहेत. एडिनबर्ग विद्यापीठातील डॉ. ग्रेगरी फंस्टन यांनी या संशोधनात महत्वाची भूमिका बजावली आहे. या सांगाड्यांना Oksoko avarsan असं नाव देण्यात आलं आहे.

ज्या पद्धतीनं हे सांगाडे सापडले आहेत त्यावरून हे डायनासोर घोळक्याने फिरत असल्याचं दिसून येत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं त्यांच्या दोन बोटांच्या हातामुळं त्यांना बदलत्या वातावरणात टिकून राहण्यास मदत झाल्याच देखील त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर या डायनासोरला पंख असल्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. हे सांगाडे खूपच चांगल्या स्थितीत असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. याचबरोबर पूर्वीच्या डायनॅसोरमध्ये तीन बोटं होती. त्यामुळं यांच्यामध्ये बदल झाल्याचं देखिल उत्तम उदाहरण असल्याचं त्यांनी म्ह्टलं आहे. oviraptors या प्रजातीच्या डायनासॉरना तीन बोटं होती. या डायनासॉरची उत्पत्ती देखील मंगोलियामध्येच झाली होती.

दरम्यान, हे डायनासोर खूप वैविध्यपूर्ण प्राणी असल्याचं निरीक्षण देखील यामध्ये नोंदवण्यात आहे. उत्तर अमेरिका आणि गोबी वाळवंटात हे प्राणी स्थलांतरित झाल्यानं त्यांच्या शरीररचनेत भौगोलिक परिस्थितीनुरूप बदल झाल्याचं देखील संशोधकांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर या डायनासोरला आजच्या पोपटासारखी चोच असल्याचं निरीक्षण देखील त्यांनी नोंदवलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 10, 2020, 11:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या