Home /News /videsh /

नवा कोरोना व्हायरस पसरतोय, ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाउनची घोषणा

नवा कोरोना व्हायरस पसरतोय, ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाउनची घोषणा

कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी हा लॉकडाउन लागू केला करण्यात आला आहे,

    ब्रिटन, 05 जानेवारी : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू (New Coronavirus) सापडल्यामुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. जगभरात ठिकठिकाणी नव्या कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे आता ब्रिटनमध्ये  (UK) पुन्हा एकदा लॉकडाउन (LockDown) लागू करण्याची घोषणा  पंतप्रधान बेरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी केली आहे. लॉकडाउनमध्ये जखडलेल्या जगाने आता कुठे कोरोनाच्या महामारीतून सुटका करून घेतली होती. तेच ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा विषाणू आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. मागील दोन आठवड्यांपासून ब्रिटनमध्ये खबरदारी घेतली जात आहे. अखेर शेवटचा तोडगा म्हणून ब्रिटनमध्ये आता लॉकडाउन करण्यात आले आहे. जवळपास पाच कोटी जनता पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये परतणार असल्याचं बेरिस जॉन्सन यांनी सांगितलं. कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी हा लॉकडाउन लागू केला जात असल्याचं बेरिस जॉन्सन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ब्रिटनमधील सर्व शाळा आणि कॉलेजस् आता बंद करण्यात आले आहे. याधी स्कॉटलंडमध्ये घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर ब्रिटनमध्येही लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा हा नवीन स्ट्रेन खूप वेगात पसरल्याचंही संशोधनातून समोर आलं आहे. ब्रिटनमध्ये जवळपास तीनपट ही नवीन प्रकरणं वाढली आहेत. वैज्ञानिकांच्या मते, केवळ 20 वर्षांखालील लोकांनाच नव्हे तर इतर वयोगटातील लोकांनाही या नव्या विषाणूची वेगाने लागण होत आहे. इम्पीरियल कॉलेजने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ब्रिटनमधील सर्व शाळा सुरु असताना संबंधित डेटा गोळा केला होता. नवीन कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ख्रिसमस नंतर शाळा बंद करण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला आहे. 11 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, दुसरीकडे ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 9 लाख 40 हजार पेक्षा अधिक लोकांना लशीचे डोस देण्यात आले आहेत. याठिकाणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि AstraZeneca च्या कोविशिल्ड आणि फायझर या लशी दिल्या जात आहेत. याबाबत सकारात्मक बातमी अशी की, ही लस नवीन कोरोना विषाणूवरही प्रभावी ठरत असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या