मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अध्यक्ष होताच जो बायडेन लागले कामाला, ट्रम्प यांचे ‘हे’ मोठे निर्णय रद्द!

अध्यक्ष होताच जो बायडेन लागले कामाला, ट्रम्प यांचे ‘हे’ मोठे निर्णय रद्द!

अमेरिकेचे अध्यक्षपदाची सुत्रं हाती घेताच जो बायडेन (Joe Biden) यांनी निर्णयांचा धडाका सुरु केला आहे. अध्यक्ष झाल्यानंतर 24 तासांच्या आत त्यांनी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे अनेक वादग्रस्त निर्णय रद्द केले आहेत.

पुढे वाचा ...

वॉशिंग्टन,  21 जानेवारी :  अमेरिकेचे अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच जो बायडेन (Joe Biden) यांनी निर्णयांचा धडाका सुरु केला आहे. अध्यक्ष झाल्यानंतर 24 तासांच्या आत त्यांनी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे अनेक वादग्रस्त निर्णय रद्द केले आहेत. यामध्ये ट्रम्प प्रशासनानं (Trump Administration) ज्या मुस्लीम देशांमधील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशासाठी बंदी घातली होती (Muslim Ban) तो निर्णय बायडेन यांनी रद्द केला आहे.

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या राजवटीमध्ये 13 मुस्लीम देशांमधील नागरिकांना अमेरिकेत प्रवास करण्यास बंदी घातली होती. यामध्ये इराण, इराक, लिबिया, सूदान, सोमालिया, सीरिया, येमन आणि नायजेरिया या प्रमुख देशांचा समावेश होता.

‘मेक्सिको वॉल’ स्थगित

बायडेन यांनी अमेरिका आणि मेक्सिको यांच्या देशाच्या सीमेवर उभारण्यात येत असलेल्या मेक्सिको वॉल (Mexico Wall) बनवण्याचा निर्णय देखाल स्थगित केला आहे. मेक्सिकोमधून अमेरिकेत होणारं बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी ही भिंत बांधण्याचा निर्णय घेतला होता. बायडेन यांनी अध्यक्ष होताच या प्रकल्पाला देण्यात येणारा निधी थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

पॅरिस करारात अमेरिका सहभागी होणार

बायडेन यांनी अध्यक्ष झाल्यानंतर काही तासांमध्येच हवामानातील बदलाशी (Climate Change) लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पॅरिस हवामानविषयक करारामध्ये (International Paris Climate Agreement) अमेरिका पुन्हा सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे.

बायडेन यांनी याबाबचच्या निर्णयावर स्वाक्षरी केल्याचं वृत्त CNN नं दिलं आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 2017 साली या करारामधून अमेरिका बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांच्या या निर्णयावर जगभरातून मोठी टीका झाली होती. पॅरिस करार अमेरिकेच्या हिताचा नसल्याचा ट्रम्प यांचा दावा होता. बायडेन यांनी यापूर्वीच अध्यक्ष होताच ट्रम्प यांचा निर्णय रद्द करणार असल्याचं जाहीर केलं होतं.

First published:
top videos

    Tags: Joe biden