नासाचं इनसाइट यान मंगळावर, मानवाचाही प्रवास सोपा होणार?

2030 पर्यंत मनुष्याला मंगळावर पाठवण्याच्या प्रयत्नासाठी नासाला मंगळ ग्रहाचे तापमान समजणं महत्वाचं आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 27, 2018 08:04 AM IST

नासाचं इनसाइट यान मंगळावर, मानवाचाही प्रवास सोपा होणार?

वॉशिंग्टन, 27 नोव्हेंबर : नासाच्या इतिहासातला आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. नासाचे इनसाइट यान मंगळ ग्रहावर उतरलंय. मंगळ ग्रहावरील परिस्थितीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने हे यान पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे भविष्यात मानवालाही मंगळ ग्रहावर जाण्याच्या दृष्टीने या यानाचं मोठं महत्व आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार आज मंगळवारी रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाइट यान मंगळ ग्रहावर उतरलं. नासाकडून याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आलं. मंगळ ग्रहावरील परिस्थितीचं रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान बनवण्यात आलं आहे.

ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना 19800 किमी प्रति तास वेगाने जाणारं हे यान सहा मिनिटांत शून्य वेगावर आलं. त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि लँड झालं. 6 महिन्यांच्या प्रवासानंतर इनसाइटन यान मंगळावर लँड केलं. नासाच्या या प्रकल्पासाठी 1 बिलियन डॉलर म्हणजेच 70 अब्ज रुपये खर्च करण्यात आलेत. सौर ऊर्जा आणि बॅटरीने ऊर्जा मिळवणाऱ्या लँडरला 26 महिन्यांपर्यंत संचलित केलं जाऊ शकते. परंतु, नासाला यापेक्षा अधिक कालावधी ते सुरु राहू शकेल अशी अपेक्षा आहे.

नासाने म्हटलंय की, “इनसाइट यान पृष्ठभागावर 10 ते 16 फुट खोल खड्डा करेल. यापूर्वीच्या मंगळ अभियानाच्या तुलनेत हे 15 टक्के अधिक खोल असेल. 2030 पर्यंत मनुष्याला मंगळावर पाठवण्याच्या प्रयत्नासाठी नासाला मंगळ ग्रहाचे तापमान समजणं महत्वाचं आहे.

इनसाइट यान हे मंगळावरील मानव पाठवण्याच्या मिशनपूर्वी त्याच्या पृष्ठभागावर उतरणं आणि येणाऱ्या भूकंपाचे मापन करण्यासाठी डिझाइन करण्यात आलंय. यानातील सिस्मोमीटरच्या मदतीने मंगळावरील अंतर्गत परिस्थितीचा अभ्यास केला जाईल.

Loading...


...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL




बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 07:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...