नेदरलँड: युट्रेक्ट शहरात गोळीबार, एक ठार तर अनेक जण जखमी

नेदरलँड: युट्रेक्ट शहरात गोळीबार, एक ठार तर अनेक जण जखमी

नेदरलँडमधील उट्रेख्त येथे झालेल्या गोळीबारात काही जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • Share this:

युट्रेक्ट (नेदरलँड), 18 मार्च: नेदरलँडमधील उट्रेख्त येथे झालेल्या गोळीबारात काही जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अज्ञात व्यक्तीकडून ट्राममध्ये झालेल्या या गोळीबारात एक ठार तर काही जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी गोळीबाराच्या वृत्ताला twitterवरुन दुजोरा दिला आहे. शहरातील 24 ऑक्टोबर स्वेअर येथे हा गोळीबार झाला आहे.

लोकांच्या मदतीसाठी पोलिसांनी हेलिकॉप्टर तैनात केले आहे. एका व्यक्तीने अंधाधुंद गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार शहरातील सर्व ट्राम सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.45 वाजता गोळीबार झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या परिसरात हा गोळीबार झाला आहे तेथे रहिवासी संख्या अधिक आहे. पोलिसांनी घटनास्थळी किंवा त्या परिसरात नागरिकांनी येऊ नये, असे आवाहन केले आहे.

दोनच दिवसांपूर्वी न्यूझीलंडमधील दोन मशिदींमध्ये गोळीबार झाला होता. ज्यात 40हून अधिक जण ठार झाले होते.

ही बातमी अपडेट होत आहे.

First published: March 18, 2019, 4:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading