आदर्श पंतप्रधान! लॉकडाऊनचे नियम पाळण्यासाठी 'या' PMनी आपल्या आईसोबत घालवले नाही शेवटचे क्षण अखेर...

आदर्श पंतप्रधान! लॉकडाऊनचे नियम पाळण्यासाठी 'या' PMनी आपल्या आईसोबत घालवले नाही शेवटचे क्षण अखेर...

नेदरलॅंड्स (Netherlands) देशाचे विद्यमान पंतप्रधान मार्क रूटा (Dutch PM Mark Rutte) सध्या जगभरातील नेत्यांसाठी एक आदर्श ठरत आहेत.

  • Share this:

ॲम्स्टरडॅम, 27 मे : नेदरलॅंड्स (Netherlands) देशाचे विद्यमान पंतप्रधान मार्क रूटा (Dutch PM Mark Rutte) सध्या जगभरातील नेत्यांसाठी एक आदर्श ठरत आहेत. या पंतप्रधानांची जगभरात चर्चा होत आहे. त्याचे कारण म्हणजे पंतप्रधान रुटा यांची आई आजारी असताना त्यांच्या शेवटच्या क्षणी ते त्यांना भेटू शकले नाही. देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, त्यामुळं या नियमांचं उल्लंघन होईल या विचारानं रुटा यांनी आपल्या आईची भेट घेतली नाही. अखेर लॉकाडाऊनच्या नियमांमध्ये सूट दिल्यानंतर मार्क आपल्या आईला भेटले, मात्र त्याच रात्री त्यांच्या आईचं निधन झालं.

नेदरलॅंड्सच्या पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मार्क ज्या रात्री आपल्या आईला भेटण्यासाठी गेले, त्याच रात्री त्यांच्या आईचे निधन झाले. प्रवक्त्यानं सांगितले की, मार्क यांच्या आई बर्‍याच दिवसांपासून आजारी होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे मार्क त्यांना भेटायला जाऊ शकले नाहीत. मार्क यांनी गेल्या सोमवारी जाहीर केले होते की, त्यांच्या 96 वर्षीय आईचे 13 मे रोजी निधन झाले. मार्क यांनी स्पष्ट केले होते की, त्यांच्या आईचे निधन कोरोनामुळं नाही तर दीर्घ आजाराने झाला.

वाचा-रुग्णांवर उपचार करणाऱ्या कोरोना वॉरियर्सचं संपूर्ण कुटुंब निघालं पॉझिटिव्ह

आईसोबत घालवू शकले नाही शेवटचे क्षण

गार्डियननं दिलेल्या वृत्तानुसार, आईसोबत शेवटचे क्षण एकत्र घालवू शकले नाही, याचे मार्क यांना दु:ख आहे. जेव्हा त्यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की कायदे पंतप्रधान असलो तरी सर्वांसाठी सारखे असतात. पीएम मार्क यांच्या आई केअर होममध्ये राहत होत्या. लॉकडाऊनच्या नियमांनुसार केअर होमला भेट देण्यास पूर्णपणे बंदी होती. पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, मार्क सतत डॉक्टरांशी फोनवरून संपर्कात होते. पण कायद्याचे उल्लंघन करणं त्यांना योग्य वाटत नव्हते. मार्क यांनी आईच्या निधनाचे वृत्त देताना आईसोबत शेवटचे क्षण घालवू शकलो नाही याचे दु: ख आहे, असे सांगितले. दुसरीकडे नेदरलॅंड्समध्ये आतापर्यंत 45 हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, 5800 जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचा-कोरोनाला हरवण्यासाठी भारत वापरणार नवा फॉर्म्युला, लस नाही तर 'हा' आहे प्लॅन

लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं

अंगावर काटा डॉक्टरांचा हा अनुभव सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकांनी अशा कोरोना वॉरियर्सना सलाम केलं आहे.