मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

नेपाळमध्ये नवं संकट; भारताकडे मागितली मदत

नेपाळमध्ये नवं संकट; भारताकडे मागितली मदत

नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या सरकारने देशाची घटना निर्दयपणे चिरडून टाकली आहे, असा आरोप प्रचंड यांनी केला आहे.

नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या सरकारने देशाची घटना निर्दयपणे चिरडून टाकली आहे, असा आरोप प्रचंड यांनी केला आहे.

नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या सरकारने देशाची घटना निर्दयपणे चिरडून टाकली आहे, असा आरोप प्रचंड यांनी केला आहे.

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : नेपाळमधील (Nepal) नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे (Nepal communist Party) विभाजन रोखण्यासाठी मदत करावी, अशी मागणी नेपाळच्या संसदीय पार्टीचे नेते पुष्पकमल दहाल प्रचंड (Pushpa kamal Dahal Prachand) यांनी भारत (India), अमेरिकेसह (America) युरोपीय देशांकडे (Europian countries) केली आहे. नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या सरकारने देशाची घटना निर्दयपणे चिरडून टाकली आहे, असा आरोप प्रचंड यांनी केला आहे. नेपाळचे संसदीय पार्टीचे नेते पुष्पकमल दहल प्रचंड यांनी भारत, अमेरिकेसह युरोपकडे नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे विभाजन रोखण्यासाठी मदत करण्याची मागणी केली आहे. प्रचंड यांनी याबाबत नेपाळचे राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मात्र त्यांना विभाजन रोखण्यासाठी कोणताच मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे त्यांनी भारत,अमेरिका आणि युरोपकडे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना विरोध करावा, अशी मागणी केली आहे. नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे विभाजन रोखण्यासाठी चीनचे (China) राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी नेपाळला एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ पाठवले आहे. नेपाळच्या लोकतांत्रिक आंदोलनाला भारताने दिला कायमच पाठिंबा चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या परदेश विभाग उपप्रमुखांच्या प्रतिनिधी मंडळाला भेटल्यानंतर नेपाळच्या एका दूरचित्रवाणी चॅनेलला मुलाखत देताना प्रचंड म्हणाले, की भारताने नेहमीच नेपाळमधील लोकतांत्रिक आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी संसद बरखास्त करताना लोकशाहीची हत्या केली असून, याबाबत भारताचे मौन समजण्यापलीकडे आहे. नेपाळच्या मुद्दयावर भारताचे मौन आणि प्रचंड यांचे वक्तव्य प्रचंड म्हणाले, की जगभरात लोकशाहीचे पहारेकरी म्हणून समजले जाणाऱ्या अमेरिका, भारत आणि युरोपीय राष्ट्रांनी याबाबत बाळगलेले मौन आश्चर्यजनक आहे. भारत हा जर खरच लोकशाहीचा पुरस्कर्ता असेल तर त्यांनी नेपाळच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करायला हवा. चीनच्या पाठिंब्याबाबत प्रचंड यांचे मौन चीनच्या पाठिंब्याबाबत प्रचंड यांना विचारले असता ते कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत. प्रचंड यांची भारताकडे मदत मागणे, हा चीनचा प्लॅन असू शकतो, कारण चीन नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे विभाजन रोखण्यासाठी प्रचंड यांना पंतप्रधानपदावर बसवू शकतो. मात्र चीन हे विभाजन रोखण्यात अपयशी ठरल्याने या प्रश्नाकडे भारताने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रचंड यांनी केली आहे. नेपाळमध्ये राज्यघटनेला निर्दयीपणे चिरडले गेले 'संसदीय लोकशाहीचे सर्वात मोठे प्रवक्ते म्हणवणारे अमेरिका, युरोप किंवा भारतासारखे देश नेपाळप्रश्नी गप्प का आहेत. नेपाळमध्ये निर्दयीपणे संविधान चिरडले गेले, घटनाबाह्य पध्दतीने संसदेची हत्या झाली तरी लोकशाही पुरस्कर्ते देश गप्प का आहेत? नेपाळमध्ये लोकशाही आणि संविधानाची हत्या झाल्याने अराजकता वाढत चालली आहे, के. पी. ओली यांच्या नेतृत्वाने देशाला खोल गर्तेत नेले आहे. त्यामुळे आमची शेजारी राष्ट्रांना विनंती आहे की त्यांनी लोकशाहीच्या बाजूने उभे राहावे आणि आम्हाला नैतिकदृष्टया पाठिंबा द्यावा,' अशी मागणी प्रचंड यांनी केली आहे.
First published:

Tags: India, Nepal

पुढील बातम्या