नेपाळची मस्ती सुरूच! आता No Man's land वरच्या पुलावर फलक लावून बदलली हद्द

नेपाळची मस्ती सुरूच! आता No Man's land वरच्या पुलावर फलक लावून बदलली हद्द

चीनबरोबरच्या सीमावादावर चर्चा सुरू असतानाच आता नेपाळने भारताबरोबर नवा सीमावाद उकरून काढला आहे.

  • Share this:

मोतिहारी, 7 जुलै : चीनबरोबरच्या सीमावादावर चर्चा सुरू असतानाच आता नेपाळने भारताबरोबर नवा सीमावाद उकरून काढला आहे. भारतीय भूभाग गिळंकृत करणाऱ्या नकाशाला नेपाळमध्ये अधिकृत मान्यता दिल्यानंतर या छोट्या शेजारी देशाने नवा वाद निर्माण केला आहे. दोन देशांच्या सीमेवरच्या No Man's Land वर हक्क सांगत नेपाळ पोलिसांनी तिथे नवा फलक लावला आहे. हा मैत्री पूल दोन्हीपैकी कुठल्याच देशाच्या हद्दीत येत नाही. पण आता नेपाळने मुद्दाम तिथेच सीमा सुरू होत असल्याचा बोर्ड लावला आहे.

वास्तविक नेपाळमध्ये अंतर्गत राजकारणात उलथापालथ सुरू आहे. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. चीनचे समर्थक मानले गेलेले ओली यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. पण यावरून लक्ष उडवून सीमेवर केंद्रित करण्याच्या उद्देशाने नवा सीमावाद उकरून काढला आहे.

नेपाळ आणि भारताच्या सीमेजवळ रक्सौलमध्ये एक पूल आहे. मैत्री पूल असं नाव असलेला हा पूल दोन देशांना जोडतो. हा पुलाचा भाग दोन्हीपैकी कुठल्याच देशाच्या मालकीचा नाही. त्यामुळे त्याला नो मॅन्स लँड म्हटलं जातं. पण आता या no man's land ची हद्द ओलांडून नेपाळ पोलिसांनी पुलाच्या सुरुवातीला नेपाळ हद्द सुरू असल्याचा फलक लावून नवा वाद ओढवला आहे.

चीनच्या नादी लागून नेपाळने मागच्या महिन्यातच भारताची नाराजी ओढवून घेतली आहे. भारताचा सीमेजवळचा भाग आपल्या देशाचा दाखवत त्यांनी नकाशा बदलला होता.

भारतीय भूभाग गिळंकृत करणाऱ्या नकाशाला नेपाळमध्ये मिळाली अधिकृत मान्यता, असेंब्लीत विधेयक मंजूर

मे महिन्यापासून दोन देशांमधल्या मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नेपाळ सीमेजवळ लिपुलेख खिंड ते उत्तराखंडमधल्या धारचुला या ठिकाणाला जोडणारा 80 किमी च्या रस्त्याच्या कामाचं उद्धाटन केलं. हा रस्ता सामरिक दृष्टीने महत्त्वाचा आहे. नेपाळने हा रस्ता आपल्या हद्दीतून जात असल्याचं सांगत त्याला विरोध दर्शवला आहे.

या रस्त्याच्या उद्घाटनानंतर नेपाळने नवा नकाशा तयार केला आणि त्यात लिपुलेखसह कालापानी आणि लिम्पियाधुरा या ठिकाणांचा समावेश आपल्या देशात दर्शवला.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 7, 2020, 5:42 PM IST

ताज्या बातम्या