मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

श्रीलंकेनंतर आता नेपाळ आर्थिक संकटात? परदेशातून 'या' वस्तू आयात करण्यावर बंदी, भारताला बसणार फटका

श्रीलंकेनंतर आता नेपाळ आर्थिक संकटात? परदेशातून 'या' वस्तू आयात करण्यावर बंदी, भारताला बसणार फटका

Nepal Economic Crisis: दरम्यान, आता परकीय चलनाच्या गंगाजळीत होणारी घसरण रोखण्यासाठी नेपाळ (Nepal) सरकारने चैनीच्या वस्तूंच्या (Luxury Items) आयातीवर बंदी घातली आहे. सध्या परकीय चलनाच्या साठ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे नेपाळ सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

Nepal Economic Crisis: दरम्यान, आता परकीय चलनाच्या गंगाजळीत होणारी घसरण रोखण्यासाठी नेपाळ (Nepal) सरकारने चैनीच्या वस्तूंच्या (Luxury Items) आयातीवर बंदी घातली आहे. सध्या परकीय चलनाच्या साठ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे नेपाळ सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

Nepal Economic Crisis: दरम्यान, आता परकीय चलनाच्या गंगाजळीत होणारी घसरण रोखण्यासाठी नेपाळ (Nepal) सरकारने चैनीच्या वस्तूंच्या (Luxury Items) आयातीवर बंदी घातली आहे. सध्या परकीय चलनाच्या साठ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे नेपाळ सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde
ाकाठमांडू, 10 एप्रिल : आपल्या शेजारी राष्ट्रांची अवस्था सध्या चांगली नाही. श्रीलंकेची (Sri Lanka) अर्थव्यवस्था (Economy) कोलमडली आहे, महागाईने कळस गाठला आहे. एका कप चहासाठी लोकांना 100 रुपये (श्रीलंकन ​​चलन) मोजावे लागतात. देशाचा परकीय चलन साठा निगेटिव झाला आहे. त्याच वेळी, पाकिस्तानची (Pakistan) आर्थिक स्थितीही फारशी चांगली नाही, पाकिस्तानमध्ये सर्व काही कर्जाच्या जोरावर अवलंबून आहे. दरम्यान, आता नेपाळची (Nepal) अर्थव्यवस्थाही डळमळीत होऊ लागली आहे. नेपाळची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. अशात नेपाळ सरकार आणि नेपाळ राष्ट्र बँक (Nepal Rastra Bank- NRB) कडून त्वरित निर्णय घेतले जात आहेत. आजतकने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. बुडत चाललेली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी उपाय परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन NRB ने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला पत्र लिहून पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे. यासोबतच बँकांना अनावश्यक कर्ज देऊ नये, असे आदेश दिले आहेत. 27 व्यावसायिक बँकांसोबतच्या बैठकीत, NRB ने सांगितले की विशेषतः वाहन कर्ज किंवा अनावश्यक कर्ज देणे टाळा. नेपाळ सेंट्रल बँकेचा हा निर्णय बुडत चाललेली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. नेपाळ सरकार दर महिन्याला आयात पेट्रोलियमसाठी भारताला 24-29 अब्ज रुपये देते. दरम्यान, आता परकीय चलनाच्या गंगाजळीत होणारी घसरण रोखण्यासाठी नेपाळ सरकारने चैनीच्या वस्तूंच्या (Luxury Items) आयातीवर बंदी घातली आहे. सध्या परकीय चलनाच्या साठ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे नेपाळ सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. काठमांडू येथून प्रकाशित होणारे इंग्रजी वृत्तपत्र myRepublica ने NRB चे प्रवक्ते गुणाकर भट्ट यांच्याशी 7 एप्रिल रोजी झालेल्या संभाषणाच्या आधारे हा अहवाल प्रकाशित केला आहे. श्रीलंकेची स्थिती 6 महिन्यांत सुधारू शकते, फक्त 'या' एकाच गोष्टीची गरज! परकीय चलनाच्या गंगाजळीत सातत्याने घसरण ते म्हणाले की, सरकार चैनीच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घालून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. कारण परकीय चलनाचा साठा सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे तातडीने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, अंतर्गत परिस्थिती सुधारण्यासाठी काही वस्तूंची आयात थांबवावी लागली. एनआरबीच्या प्रवक्त्यानुसार, आर्थिक संकटामुळे ही पावले उचलली गेली नाहीत. त्याचबरोबर त्यांनी लोकांना सांगितले की, अर्थव्यवस्थेबाबत अनेक अफवा आहेत, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. गुणाकर भट्ट म्हणाले की, NRB कडे वस्तू आणि सेवांची आयात 6 ते 7 महिने टिकवून ठेवण्यासाठी परकीय चलनाचा साठा आहे. गेल्या काही दिवसांत अर्थव्यवस्थेने सकारात्मक संकेत दिले आहेत. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की लोक रोजगारासाठी देश सोडून वेगाने जात आहेत. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, पावले उचलली जात आहेत, लवकरच सुधारणा दिसून येतील. भारतासोबत चांगले संबंध असतानाही श्रीलंकेनं का ताब्यात घेतले 12 भारतीय मच्छिमार? सुटकेसाठी मागितली इतकी रक्कम वस्तूंच्या आयातीवर बंदी नेपाळ सरकारने सायकल, डिझाइन वाहने, मोपेड आणि अत्यावश्यक मोटर उपकरणे, तांदूळ, कापड उत्पादने, यंत्रसामग्री आणि सुटे भाग, सोने, तांदूळ, इलेक्ट्रिकल उपकरणे, तयार कपडे, चांदी आणि धागा यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. याशिवाय, सिमेंट, खेळणी, जार, क्रीडासाहित्य आणि संबंधित वस्तू, दगडी सजावटीचे साहित्य, चांदी, चांदीचे नक्षीकाम केलेले साहित्य, फायरप्लेसची भांडी, फर्निचर आणि संबंधित वस्तूंच्या आयातीसाठी लेटर ऑफ क्रेडिट (LC) उघडले जाणार नाही. म्हणजेच पुढील आदेश येईपर्यंत आयात प्रतिबंधित राहील. प्रतिबंधित वस्तूंची लांबलचक यादी त्याचबरोबर लाकूड, हेअर क्रीम आणि शॅम्पू, परफ्यूम, वॉकिंग स्टिक, शूज, मेकअप आयटम, दातांसाठी ब्रेसेस, कोळसा आणि फर्निचर, छत्री आणि विणकाम कपडे यांच्या आयातीसाठी एलसी उघडली जाणार नाही. यासोबतच वनस्पती, मिरची, मासे, भाजीपाला आणि काजू, दुग्धजन्य पदार्थ, सुपारी, चणे, नैसर्गिक मध आणि अंडी, केळी आणि चिप्स, मांस, ऑप्टिकल, वैद्यकीय आणि सर्जिकल उपकरणांसह अनेक वस्तूंच्या आयातीवरही बंदी घालण्यात आली आहे. यातील बहुतांश वस्तू नेपाळ भारतातून आयात करतो. दरम्यान, नेपाळचे अर्थमंत्री जनार्दन शर्मा यांनी श्रीलंकेप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था कोलमडणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. नेपाळच्या आर्थिक आरोग्याची श्रीलंकेशी केलेली तुलना चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नेपाळच्या अर्थमंत्र्यांच्या मते नेपाळ श्रीलंकेप्रमाणे विदेशी कर्जाच्या ओझ्याने दबलेला नाही. तसेच अर्थव्यवस्थेतील उत्पादन आणि महसूल व्यवस्थेच्या बाबतीत नेपाळची स्थिती श्रीलंकेपेक्षा चांगली आहे.
First published:

Tags: Nepal

पुढील बातम्या