गॅस गिझरनंतर आता गॅस हिटरने घेतला 8 जणांचा बळी, रिसॉर्टमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ

गॅस गिझरनंतर आता गॅस हिटरने घेतला 8 जणांचा बळी, रिसॉर्टमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ

थंडी असल्याने रूममध्ये गॅस हिटर लावणं 8 जणांच्या जीवावर बेतलं असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • Share this:

काठमांडू, 21 जानेवारी : केरळमधील 8 जणांचे मृतदेह नेपाळच्या एका रिसॉर्टमध्ये सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पर्यटनासाठी नेपाळला गेलेल्या 8 पर्यटकांचे मृतदेह नेपाळमधील दमन इथल्या एका रिसॉर्टमध्ये आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी घटनेची माहिती घेत असल्याचं सांगितलं आहे.

नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले आठ भारतीय हॉटेलच्या रुममध्ये मृतावस्थेत सापडले आहेत. दामन येथील एका हॉटेलमध्ये हे भारतीय मुक्कामासाठी उतरले होते. हे सर्व भारतीय पर्यटक केरळचे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, केरळमधील काही लोक पर्यटनासाठी नेपाळला गेले होते. त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. रिसॉर्टमध्ये असलेल्या गॅस हिटरमुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

थंडी जास्त असल्यानं रूममध्ये हिटर लावण्यात आला होता. यावेळी दरवाजा आणि खिडक्या बंद असल्याने सर्वांचा गुदमरून मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. दरम्यान, ही घटना समजली तेव्हा सर्वजण बेशुद्धावस्थेत होते. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

माकवानपूर जिल्हा पोलीस कार्यालयातील पोलीस अधिकारी सुशील सिंग राठोड यांनी सांगितलं की, नेपाळमध्ये थंडी असल्याने हिटर लावण्यात आला होता. तसेच खोली आतून बंद होती. या घटनेतील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अधिक तपास केला जात आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईत गॅस गिझरमुळे एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला होता. गॅस जळताना कार्बन मोनॉक्साईडचं उत्सर्जन होतं आणि तेच मुलीच्या जीवावर बेतलं होतं. त्यानंतर आता गॅस हिटरने 8 जणांचे प्राण गेल्यानं खळबळ उडाली आहे.

हौसेला मोल नाही! 100% मिळवूनही 'या' एका कारणामुळे पुन्हा परीक्षा देणार जुळे भाऊ

First published: January 21, 2020, 3:48 PM IST
Tags: keralNepal

ताज्या बातम्या