Home /News /videsh /

नेल्सन मंडेलांच्या मुलीचं निधन; वर्णभेदविरोधी चळवळीचा होत्या मुख्य चेहरा

नेल्सन मंडेलांच्या मुलीचं निधन; वर्णभेदविरोधी चळवळीचा होत्या मुख्य चेहरा

नेल्सन मंडेला यांच्यानंतरही वर्णभेदविरोधात उभं राहून आपल्या हक्कासाठी लढण्याचं कार्य त्यांची मुलगी करीत होती

    जोहान्सबर्ग, 13 जुलै : दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती आणि वर्णभेदविरोधी चळवळीचे नायक नेल्सन मंडेला (Nelson Mandela) यांची मुलगी जिंन्डझी मंडेला (Zindzi Mandela) यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. जिंन्डझी यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले. सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस (एएनसी) च्या प्रवक्त्याने सोमवारी ही माहिती दिली. स्टेट टेलिव्हिजन दक्षिण आफ्रिका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने सांगितले आहे की, मंडेला यांचे सोमवारी सकाळी जोहान्सबर्गमधील रुग्णालयात निधन झाले. मृत्यूच्या वेळी त्या डेन्मार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या राजदूत म्हणून सेवा करीत होत्या. 2013 मध्ये नेल्सन मंडेला यांचे निधन झाले. तर आई विनी मंडेला यांचे 2018 मध्ये निधन झाले. हे वाचा-बापरे! रुग्णालयाने दिलं 28 लाखांचं बिल; कोरोना रुग्णाने नकार दिल्यास ठेवलं ओलीस रंगभेदविरोधी चळवळीचे मुख्य कार्यकर्ता होत्या जिन्डझी जिन्डझी मंडेलाची आई विनी माडीकिजेला-मंडेला होत्या, त्या  रंगभेदविरोधी चळवळीतील एक मुख्य कार्यकर्ता होत्या. विनी मंडेला यांची मुलगी जिन्डझी यांनी 1985 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती पी.डब्ल्यू बोथा यांच्या स्वातंत्र्यांच्या प्रस्तावाची नेल्सन मंडेला यांच्या द्वारे स्वीकृत केलेला प्रस्ताव संपूर्ण जगासमोर वाचला. हे वाचा-Explainer : चीनचा मोठा प्लान; भूतानशी सीमा वाद, मात्र भारत लक्ष्य त्यांच्या मृत्यूचं कारणं अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.  आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (एएनसी) च्या प्रवक्त्या पुले माबे यांनी सांगितले की, त्या अकाली गेल्या आणि समाज बदलण्याच्या प्रक्रियेत त्या मोठी भूमिका निभावत होत्या. भविष्यातही त्यांनी खूप काम केलं असतं. आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसमध्येही त्या मोठी भूमिका साकारत होत्या. पुढील तपशील योग्य वेळी सांगितले जाईल असे माबे म्हणाले. नेल्सन मंडेला फाउंडेशनने जिन्डझी मंडेला यांच्या निधनाबद्दल भाष्य करण्याच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या