Home /News /videsh /

विमान हवेत असताना पायलट अचानक आजारी, धाडसी प्रवाशाने कमान घेतली हातात, प्रचंड थरारक घटना

विमान हवेत असताना पायलट अचानक आजारी, धाडसी प्रवाशाने कमान घेतली हातात, प्रचंड थरारक घटना

एका प्रवाशाने काहीही अनुभव नसताना यशस्वीपणे विमानाचं लँडिंग करून सर्वांना थक्क केलं. विमानात बसलेल्या लोकांचा श्वासच थांबला होता. पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. जिथे पायलट अचानक आजारी पडल्यामुळे एका प्रवाशाला विमान चालवावं लागलं.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 11 मे : जेव्हा एखादी आपत्ती अचानक येते तेव्हा माणूस कधीही काहीही करू शकतो. देवाचे नाव घेऊन लोक अशी जबाबदारी उचलायला निघतात, ज्याबद्दल आपल्याला एबीसीडी पण माहिती नसते. कधी-कधी अनुभव नसतानाही सर्व काही जुळून येतं. असाच काहीसा थरारक पराक्रम एका व्यक्तीनं केला, ज्यानं शून्य अनुभवाने विमान उडवून सर्वांना थक्क केलं. काहीच अनुभव नसलेल्या एका प्रवाशाने फ्लाइट उडवून सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, त्यावेळी अक्षरश: जीव घशात आलेल्या प्रवाशांना भगवंताचे स्मरण करण्याशिवाय काही मार्ग नव्हता. आलेल्या बिकट प्रसंगामुळे विमानात बसलेल्या लोकांचा श्वास थांबल्यातच जमा होता. त्यानंतर एका प्रवाशाने विमानाचा ताबा घेतला, ज्याला या कामाचा काही अनुभव नव्हता. पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. पायलट अचानक पडल्यामुळे एका प्रवाशाला विमान उडवण्याची जबाबदारी घ्यावी लागली. पायलटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही तेव्हा कंट्रोल रुमला कळलं. (भंडाऱ्यात भाजपमध्ये राडा, पक्ष 'हा' लिमिडेट लोकांचा पक्ष, माजी आमदाराचं टीकास्त्र) प्रवाशानं केली कमाल एअर ट्रॅफिक कंट्रोलने पायलटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना अशी धक्कादायक माहिती मिळाली. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या विमानाशी संपर्क साधला जात होता, त्याची कमान पायलटच्या नव्हे तर सामान्य नागरिकाच्या हातात होती. कॉकपिटमधून एका आवाजाने उत्तर दिले, ज्याला पूर्वी कधीच फ्लाइटमधून प्रवास करण्याव्यतिरिक्त कोणतीही माहिती किंवा अनुभव नव्हता. विमानातील परिस्थिती पाहून नियंत्रण कक्षात बसलेल्या लोकांचे होश उडाले. साधारणपणे, उड्डाण करण्यासाठी कोणत्याही पायलटला सुमारे 60 तासांचा प्रशिक्षण अनुभव आणि किमान 10 तास एकटे पर्यवेक्षण आवश्यक असते. परंतु, येथे ज्याच्या हातात विमानाची कमान होती त्या व्यक्तीला उड्डाणाबाबत कसलाच अनुभव नव्हता. महत्त्वाचे म्हणजे तरीही त्याने यशस्वीपणे आणि शांततेत लँडिंग केले. सौ. सोशल मिडीया : कंट्रोल रूमचे निर्देश धैर्यपूर्वक ऐकून आणि समजून घेऊन सुरक्षित करा आणि यशस्वी आणि सुरक्षित लँडिग केल्याबद्दल विमान उड्डाण तज्ज्ञांचीही मति गुंग झाली आहे.
  सौ. सोशल मिडीया : कंट्रोल रूमचे निर्देश धैर्यपूर्वक ऐकून आणि समजून घेऊन सुरक्षित करा आणि यशस्वी आणि सुरक्षित लँडिग केल्याबद्दल विमान उड्डाण तज्ज्ञांचीही मति गुंग झाली आहे.
  संयम आणि शांततेने उतरण्यात यश 14 सीटर Cessna Caravan plane बसलेल्या एका प्रवाशाचा आवाज कंट्रोल रूममधल्या अधिकाऱ्यांना आला. या वेळी, विमान लँडिंगपासून 70 मैलांवर होतं. तो प्रवासी रेडिओवर सांगत होता, 'इथे गंभीर परिस्थिती झाली आहे. आमच्या पायलटची तब्येत बिघडली आहे. मला विमान कसं उडवायचं ते माहित नाही.'' हे ऐकल्यानंतर जमिनीवरच्या कंट्रोल रूममध्ये असलेल्यांची गाळणच उडाली. त्यांनी श्वास रोखला. आता दुसरा पर्यायच नव्हता, म्हणून दोघेही शांतपणे आणि संयमाने एकमेकांशी बोलू लागले. त्यानंतर नियंत्रण कक्षाकडून पंख्यांची पातळी योग्य राखण्यासाठी आणि उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे स्थिती राखण्यासाठी, किनाऱ्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना मिळू लागल्या. तोपर्यंत विमानाची स्थिती जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू होते. पायलटच्या जागेवर बसलेल्या प्रवाशाने सूचनांप्रमाणे विमान चालवण्यास सुरुवात केली. प्लेनला बोका रॅटनच्या उत्तरेस 25 मैलांवर पाम बीचवर उतरण्याची सूचना देण्यात आली. मग प्रत्यक्षात विमान कसं उतरवायचं, याचं हवेतच प्रशिक्षण देण्यात आलं. एव्हिएशन तज्ज्ञ जॉन नॅन्स यांनी न्यूयॉर्क पोस्टला सांगितलं की, "विमान चालवण्याचा काहीही अनुभव नसलेल्या व्यक्तीने विमान व्यवस्थित उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे."
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Airplane

  पुढील बातम्या