S M L

आणि म्हणून अमेरिकेच्या 2 प्रतिबंध केंद्रात जवळपास 100 भारतीय अटकेत !

अमेरिकेत भारतीय मिशनने दोन मोठ्या प्रतिबंध गृहांना संपर्क साधला असता जवळपास 100 भारतीय अमेरिकेत कैद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 23, 2018 04:37 PM IST

आणि म्हणून अमेरिकेच्या 2 प्रतिबंध केंद्रात जवळपास 100 भारतीय अटकेत !

अमेरिका, 23 जून : अमेरिकेत भारतीय मिशनने दोन मोठ्या प्रतिबंध गृहांना संपर्क साधला असता जवळपास 100 भारतीय अमेरिकेत कैद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यातील बहुतांश लोक हे पंजाबचे आहेत. यांनी देशाच्या दक्षिणी सीमेकडून बेकायदेशीररित्या प्रवेश केल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

भारतीय दूतावासाने एका वक्तव्यात स्पष्ट केलं की दोन्ही प्रतिबंधगृहांशी संपर्क साधला गेला आहे. आपले एक दूतावास अधिकारी ऑरगॉनच्या केंद्राला भेट देऊन आलेत आणि लवकरच दुसरे अधिकारी न्यू मॅक्सिकोच्या प्रतिबंधगृहाला लवकवरच भेट देणार आहेत. आम्ही तेथील स्थितीवर लक्ष ठेवून आहोत. अस भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आलं आहे.

कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करणाऱ्या या पुण्याच्या पाट्या


येथे 12हून अधिक लोक न्यू मॅक्सिकोच्या प्रतिबंध कारागृहात गेल्या अनेक महिन्यांपासून कैद आहेत. उर्वरित भारतीयांना साधारण एक आठवड्यापूर्वी आणलं गेलं आहे. त्यातील बहुतांश लोक आश्रयाची मागणी करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार परदेशात त्यांना हिंसा आणि छळाचा सामना करावा लागत आहे.

नॉर्थ अमेरिकन पंजाब असोसिएशन (नापा)चे अध्यक्ष सतनाम सिंह यांनी सागितले की हजारो भारतीय अमेरिकेच्या जेलमध्ये कैद आहेत. त्यातील बहुतांश एकट्या पंजाब प्रांतातील आहेत.

तरुणांना गळाभेट करून ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या आलिशाला पश्चाताप, मागितली सगळ्यांची माफी

Loading...

फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन अॅक्टमध्ये नापाला मिळालेल्या माहितीनुसार वर्ष 2013,2014, आणि 2015 या 3 वर्षांत 27000हून अधिक भारतीयांना सीमा ओलांडताना पकडलं गेलं आहे. ज्यात 4000 महिला आणि 350 मुलांचा समावेश आहे.

अमरिकेचा असा आरोप आहे की पंजाबमध्ये मानव तस्कर, अधिकारी आणि राजकीय नेते मिळून युवकांना भडकवतात ज्यामुळे ते आपले घरदार सोडून अनधिकृतरित्या अमेरिकेला जातात. ज्यासाठी प्रतिव्यक्ती 50 रुपये वसूल केले जातात. त्यांनी पंजाब सरकारला मानव तस्करी कायदा अधिक कडक करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा...

खंडाळा घाटात दरड कोसळल्याने मुंबई-पुणे वाहतुकीचा खोळंबा

पुण्यात प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, धडापासून शीर केलं वेगळं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2018 04:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close