महिला पत्रकाराने जेव्हा मोदींना विचारलं, तुम्ही टि्वटरवर आहात का ?

महिला पत्रकाराने जेव्हा मोदींना विचारलं, तुम्ही टि्वटरवर आहात का ?

  • Share this:

02 जून : पत्रकार कधी कधी असे प्रश्न विचारतात की त्यामुळे त्यांचीच फजिती होते. नॅशनल ब्रॉडकास्टींग कंपनीची निवेदिका मॅगन कॅलींना पंतप्रधान नरेंद्र मोदींना असाच एक प्रश्न विचारणे महागात पडले.

कॅलींनी मोदींना एका मुलाखतीत विचारले की तुम्ही टि्वटरचा वापर करतात का? चॅनलने हा व्हिडिओ शेअर केल्यावर लोकांनी या प्रश्नावर खूप टीका केलीयं. लोकांनी कॅलींना नीट होमवर्क करण्याचा सल्लाच दिलाय.

नुकत्याच ट्वीटरवर सर्वाधिक फॉलोअिंग असलेल्या नेत्यांच्या यादीत मोदींचा तिसरा क्रमांक लागला. चॅनलच्या या ट्वीटवर  जवळपास 1000हून अधिक लोकांनी टीका करत कॅलींच्या गृहपाठावर प्रश्न उपस्थित केलाय.

कॅली या आधी अमेरिकी न्यूज कंपनी 'फॉक्स'च्या रिपोर्टर होत्या. याच शो मध्ये मोदींनी कॅलींच्या छत्रीसोबत काढलेल्या प्रसिद्ध फोटोचा उल्लेख केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2017 10:58 PM IST

ताज्या बातम्या