Home /News /videsh /

EXCLUSIVE : नवाझ शरीफ लवकरच पाकमध्ये परतणार? इम्रान खान यांना हटवण्यासाठी लष्कराची खेळी

EXCLUSIVE : नवाझ शरीफ लवकरच पाकमध्ये परतणार? इम्रान खान यांना हटवण्यासाठी लष्कराची खेळी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ

इम्रान खान (Imran Khan) यांना शह देण्यासाठी पाकिस्तान लष्कराकडून (Pak Military) माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांना देशात परत येण्याचं आमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे इम्रान यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हं दिसत आहेत.

पुढे वाचा ...
इस्लामाबाद, 16 नोव्हेंबर : पाकिस्तानमधील (Pakistan) ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढती महागाई, गरिबी, कोरोना साथीचा बसलेला फटका या सगळ्यांमुळे सध्या पंतप्रधान इम्रान खान (Imran khan) यांच्या कारभाराबाबत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदावरुन हटवण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे आता पाकिस्तानच्या सरकारवर प्रभाव असणाऱ्या लष्करानंही यात उडी घेतली आहे. इम्रान खान यांना शह देण्यासाठी माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांना देशात परत येण्याचं आमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे इम्रान खान यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हं दिसत असून त्यांचं पंतप्रधानपद (Prime Ministership) धोक्यात आलं आहे.

पाकिस्तानच्या लष्कराची नवाज शरीफांना मायदेशी परतण्याची सूचना

सूत्रांनी CNN-News18ला दिलेल्या माहितीनुसार, शरीफ यांची पाकिस्तानला गरज असून, त्यांनी मायदेशात परत यावं अशी सूचना पाकिस्तानच्या लष्कराने (Pak Military) केली आहे. लष्कर आणि इम्रान खान यांच्यात झालेल्या कुरबुरीनंतर या घडामोडी घडल्या आहेत. लष्कराची खप्पा मर्जी झाल्यामुळे माजी क्रिकेटपटू आणि सध्या पंतप्रधान असलेल्या इम्रान खान यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यासाठी लष्कराने भ्रष्टाचाराचा आरोप असणारे आणि देश सोडून परदेशात आसरा घेतलेले नवाज शरीफ यांना हाताशी धरलं आहे. हेही वाचा : जागतिक महासत्ता अमेरिकेची पिछेहाट, चीन बनला सर्वाधिक श्रीमंत देश

नवाज शरीफ यांच्यावर नेमके आरोप काय?

नवाज शरीफ यांच्यावर अॅव्हेनफिल्ड प्रॉपर्टीज (Avenfield properties) आणि अल-अझिझिया स्टील मिल्स प्रकरणात (Al-Azizia Steel Mills) मोठा भ्रष्टाचार (Corruption) केल्याचा आरोप आहे. डिसेंबर 2019 मध्ये इस्लामाबाद उच्च न्यायालयाने (Islamabad High Court) त्यांना दोषी घोषित केलं होतं. या आणि अन्य खटल्यांच्या सुनावणीसाठीही ते उपस्थित राहिले नव्हते. भ्रष्टाचाराचा आरोप होताच त्यांनी देशातून पलायन केलं होतं. हेही वाचा : उद्धव ठाकरेंना कुणी मुख्यमंत्री मानत नाही, फडणवीसांचा घणाघात 2018 मध्ये पाकिस्तानमधल्या वरिष्ठ न्यायालयाने शरीफ यांना त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या गुन्ह्याखाली 10 वर्षांचा तुरुंगवास आणि अ‍ॅव्हेनफिल्ड प्रकरणाच्या तपासात सहकार्य न केल्याबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्याचवर्षी, अल-अझिझिया स्टील मिल भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या ठिकाणी बेकायदा गुंतवणूक आढळून आली होती. या सर्व शिक्षा त्यांना एकाच वेळी भोगायच्या होत्या. त्यावेळी त्यांनी वैद्यकीय उपचारांचं कारण देऊन परदेशात आसरा घेतला होता. लाहोर उच्च न्यायालयानं त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी 4 आठवड्यांकरिता परदेशात जाण्याची परवानगी दिल्यानंतर शरीफ यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये लंडनला (London-UK) प्रस्थान केलं होतं. त्यानंतर ते मायदेशात परतलेच नाहीत. तेव्हापासून ते लंडनमध्येच वास्तव्याला आहेत.

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ होणार

दरम्यान, अलीकडेच गिलगिट-बाल्टिस्तानचे मुख्य न्यायमूर्ती राणा एम. शमीम यांनी शपथपत्र दाखल करुन जाहीर केलंय, की तत्कालीन सरन्यायाधीश साकिब निसार यांनी उच्च न्यायालयाला नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना 2018 च्या सार्वजनिक निवडणुकांपूर्वी जामिनावर सोडू नये, असे आदेश दिले होते. नवाझ शरीफ यांच्या निकटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रतिज्ञापत्र केवळ लष्कराच्या संमतीनंतरच दाखल केलं गेलं आहे. ते माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अडकवण्यासाठी दाखल करण्यात आलं असावं. मात्र नवाज शरीफ यांच्या पुनरागमनामुळे इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यांच्यासाठी हा मोठा धोका ठरण्याची शक्यता आहे. शरीफ यांच्या आगमनामुळे इम्रान खान यांना राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, अशी अटकळ बांधली जात आहे.

इम्रान खान यांना पद गमवावं लागणार?

सीएनएन न्यूज 18 ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्यासमोर दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत. एक म्हणजे 20 नोव्हेंबरपूर्वी त्यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा किंवा मग विरोधी पक्ष संसदेत बदल घडवून आणतील. दोन्ही पर्यायांमध्ये इम्रान खान यांना पद गमवावं लागणार हे निश्चित आहे. येत्या आठवड्याभरात सत्ताधारी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाची मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (MQM) आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (PML-Q) यांच्या समवेतची युती तुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, पीटीआयकडून (PTI) परवेझ खट्टक आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) या पक्षाकडून (Pakistan Muslim League (PML-Q-Nawaz)) शाहबाज शरीफ यांची नावं पंतप्रधानपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची (Economy) बिकट स्थिती आणि प्रमुख ठिकाणी हिंसक निदर्शनं करणाऱ्या टीएलपी (TLP) गटाच्या मागण्या मान्य करण्याचा इम्रान खान यांचा निर्णय त्यांना गोत्यात आणणारा ठरला असून, त्यांच्या विरोधात देशातल्या जनतेत प्रक्षोभ निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं आहे. पाकिस्तानमधल्या या राजकीय घडामोडींकडे भारताचंही बारीक लक्ष आहे. तिथली राजकीय स्थिती काय वळण घेते याकडे राजकीय अभ्यासकांचं आणि राजकारण्यांचंही लक्ष लागलं आहे.
First published:

Tags: Imran khan, Pakistan

पुढील बातम्या