'पनामा गेट' प्रकरणात नवाझ शरीफ दोषी, पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचा निकाल

'पनामा गेट' प्रकरणात नवाझ शरीफ दोषी, पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचा निकाल

नवाझ शरीफ यांच्यावरचे आरोप सिद्ध झाल्यामुळे त्यांचं पंतप्रधानपदही धोक्यात आलंय.

  • Share this:

इस्लामाबाद, 28 जुलै: पनामा गेट प्रकरणात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवलंय. नवाझ शरीफ यांच्यावरचे आरोप सिद्ध झाल्यामुळे त्यांचं पंतप्रधानपदही धोक्यात आलंय.

शरीफ यांच्यावर 1990 साली पंतप्रधान असताना लंडनमध्ये अवैध संपत्ती विकत घेतल्याचा आरोप होता. ही मालमत्ता शरीफ यांची मुलं सांभाळत होती. या मालमत्तेत लंडनमधील 4 महागड्या फ्लॅट्सचाही समावेश आहे. या प्रकरणाचा खुलासा 2016 साली पनामा पेपर लीक्समध्ये करण्यात आला होता. दरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी शुक्रवारी पनामा गेट केसचा निकाल आल्यानंतर गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन राजकारण सोडणार असल्याचं सांगितलं होतं. या खटल्याने पाकिस्तानात मोठी राजकीय खळबळ माजवली आहे.

First published: July 28, 2017, 1:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading