पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी नवज्योतसिंग सिद्धूला दिली ही खास ऑफर!

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी नवज्योतसिंग सिद्धूला दिली ही खास ऑफर!

'शांतता निर्माण होणं हे दोनही देशांच्या फायद्याचं आहे. सिद्धू जे काम करताहेत त्यामुळं ताणलेले संबंध सुधारण्यास मदत होईल.'

  • Share this:

करतारपूर (पाकिस्तान) 28 नोव्हेंबर : नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानात येवून काही गुन्हा केला नाही. ते शांततेता पैगाम घेऊनच आले होते. त्यामुळं त्यांच्यावर एवढी टीका का केली गेली हेच कळत नाही. सिद्धूने पाकिस्तानात येऊन निवडणुक लढवावी, असं झालं तर ते जिंकतील असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे. करतारपूर कॉरिडॉरचं भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना खास निमंत्रण देण्यात आलं होतं.

इम्रान खान म्हणाले, दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण झाली पाहिजे. शांततेशिवाय कुठलाही मार्ग नाही. शांतता निर्माण होणं हे दोनही देशांच्या फायद्याचं आहे. सिद्धू जे काम करताहेत त्यामुळं ताणलेले संबंध सुधारण्यास मदत होईल.

भारतातल्या पंजाबमधल्या गुरूदासपूर जिल्ह्यातल्या डेरा बाबा नानक या स्थानापासून ते पाकिस्तानातल्या पंजाबमधल्या करतारपूर साहेब यांना महामार्गाने जाडण्यात येणार आहे.

त्या मार्गाला 'करतारपूर कॉरिडॉर' असं नाव देण्यात आलंय. ही दोनही स्थानं शीख धर्मियांसाठी अतिशय पवित्र समजली जातात.

गेल्या अनेक दशकांपासून 'करतारपूर कॉरिडॉर'साठी शिख बांधव मागणी करत होते. काही दिवसांपूर्वीच या कॉरिडॉरला केंद्र सरकारनं मान्यता दिली. तर पाकिस्तान सरकारनेही या प्रकल्पाला मान्यता दिलीय. भारतातल्या पंजाब मधल्या गुरूदासपूर आणि पाकिस्तानातल्या पंजाब मधल्या करतारपूरला महामार्गने जोडण्यात येणार आहे. त्यामुळं व्हिसा न घेताही दोन्ही देशांचे भाविक ये जा करू शकणार आहेत.

पाकिस्तान आणि भारतात शांतता निर्माण व्हावी यासाठीच सिद्धू प्रयत्न करत आहेत. त्यामुळं त्यांच्या पाकिस्तानभेटीवर येवढी टीका का झाली तेच कळत नाही असं इम्रान खान म्हणाले. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार राहिलेल इम्रान खान आणि सिद्धू याच जुनं नातं आहे.

'करतारपूरचं' काय आहे महत्त्व?

पाकिस्तानातल्या पंजाबमध्ये करतारपूर साहेब हा गुरूव्दारा आहे. रावी नदीच्या काठावर असलेला हा गुरूद्वारा शीख धर्मियांसाठी अत्यंत पवित्र आहे. लाहोरपासून हे ठिकाण 120 किमी अंतरावर आहे. तर भारतीय सीवेवरून अवघ्या तीन किलोमिटर अंतरावर आहे.

शिख धर्मियांचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांनी आपल्या आयुष्यातली 18 वर्ष या ठिकाणी व्यतित केली होती. त्यांचं निधनही याच ठिकाणी झालं होतं. त्या ठिकाणी आता गुरूद्वारा बाधण्यात आला. त्यालाच गुरूद्वारा करतारपूर साहेब असं म्हणतात

 

VIDEO: पुण्यात अग्नितांडव, तब्बल 150 झोपड्या आगीत जळून खाक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 06:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading