Home /News /videsh /

Russia-Ukraine War: काहीतरी मोठं घडणार? बायडेन यांची नाटोसोबत बैठक, रशियाची अण्वस्त्र हल्ल्याची धमकी

Russia-Ukraine War: काहीतरी मोठं घडणार? बायडेन यांची नाटोसोबत बैठक, रशियाची अण्वस्त्र हल्ल्याची धमकी

russia ukraine war

russia ukraine war

नाटोने रशियाच्या सीमेजवळ सराव तीव्र केला आहे. पाश्चात्य देशही रशियाभोवती त्यांच्या सैन्याची तैनाती वाढवत आहेत. या सर्व घडामोडी पाहिल्यानंतर काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    नवी दिल्ली 25 मार्च : युक्रेन-रशियामध्ये (Russia Ukraine War) सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या नाटोसोबतच्या बैठकीची चर्चा जोर धरू लागली आहे. बायडेन यांनी तीन बॅक टू बॅक आपत्कालीन बैठका घेतल्या आहेत. रशियासाठी हे अत्यंत वाईट चिन्ह म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, नाटोने रशियाच्या सीमेजवळ सराव तीव्र केला आहे. पाश्चात्य देशही रशियाभोवती त्यांच्या सैन्याची तैनाती वाढवत आहेत. या सर्व घडामोडी पाहिल्यानंतर काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरूवारी ब्रसेल्समध्ये नाटो नेत्यांची बैठक झाली आहे (NATO leaders met in Brussels). बैठकीत सर्वांनी ठरवलं की रशियाच्या विरोधात युक्रेनला सुरक्षा सहाय्य दिले जात राहील. त्याचवेळी, नाटो बाल्टिक समुद्रापासून काळ्या समुद्रापर्यंत आठ युद्धनौका तैनात करण्याच्या तयारीत आहे. या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि जगातील 30 देशांचे प्रमुख यांच्यात दीर्घ चर्चा झाली. NATO चे 30 देश, G-7 चे 7 देश आणि युरोपियन युनियनचे 27 देश एकत्र येऊन पुतिन यांच्यावर दबाव आणू इच्छितात. नाटोला रशियासोबत धोका पत्करायचा नाही. तर लष्करी वेढा घालून आपल्या देशांवर हल्ला झाल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तरासाठी तयार राहायचं आहे. नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉलेनबर्ग यांनी पूर्व सीमेवर आपल्या जमीन, जल आणि हवेत सैन्याची संख्या वाढवण्यास कोणीही आक्षेप घेणार नाही, अशी आशा व्यक्त केली आहे. पहिल्या टप्प्यात नाटोचे चार लढाऊ गट बल्गेरिया, रोमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया येथे पाठवले जातील. दुसरीकडे, नाटोच्या प्रत्येक पावलावरून रशियाचा रोष बाहेर येत आहे. नाटोने हस्तक्षेप केल्यास पुतिन अण्वस्त्र हल्ला करू शकतात, असं अमेरिकेतील रशियाचे उपराजदूत दिमित्री पोलान्स्की यांनी म्हटलं होतं. याआधी क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करण्याबाबत बोललं होते. 24 तासांत रशियाकडून युक्रेनवर अण्वस्त्र हल्ल्याच्या दोन धमक्या आल्या आहेत. नाटोने रशियाला चिथावणी दिली तर आम्हाला अण्वस्त्रे वापरण्याचा अधिकार आहे, असं दिमित्री पोलान्स्की यांनी म्हटलं आहे. एक दिवस अगोदर बुधवारी क्रेमलिनचे प्रवक्ते Dmitry Peskov यांनी युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करण्याबाबत बोललं होतं. जर रशियाला "अस्तित्वाचा धोका" असेल तर ते अण्वस्त्रांचा वापर करेल, असं त्यांनी म्हटलं होतं. जगातील अण्वस्त्रांची सर्वात मोठी खेप रशियाकडे आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: America, Russia Ukraine, War

    पुढील बातम्या