Home /News /videsh /

'या' देशात बलात्काराच्या दोषींनी दिली जाते कडक शिक्षा, केले जाते नपुंसक

'या' देशात बलात्काराच्या दोषींनी दिली जाते कडक शिक्षा, केले जाते नपुंसक

अनेकदा बलात्काऱ्यांना फाशी देण्याची मागणी केली जाते. मात्र काही देशांमध्ये याहून कडक शिक्षा दिल्या जातात.

    नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : भारतात बलात्कार आणि महिलांवरचे अत्याचार याबद्दल समाजात खूप राग आहे. दिल्ली, हाथरससारख्या घटना घडल्यानंतर सोशल मीडिया आणि टीव्ही चर्चांतून हा राग व्यक्त होत असतो. अशात अनेकदा बलात्काऱ्यांना फाशी देण्याची मागणी केली जाते. जगातील काही देशांच्या कायद्यांत तशी तरतूद असेलही. पण अनेक देशांमध्ये बलात्काराचा आरोप सिद्ध झालेल्या दोषीला नपुंसक करण्याची शिक्षा न्यायलय सुनावतं. कोरोना विषाणू महामारीमुळे नायजेरियातील कदूना राज्याने बलात्काऱ्यांना नपुंसक करण्याची शिक्षा देण्याचा निणय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे लॉकडाउनमध्ये बलात्काराच्या घटना वाढल्या. त्यामुळे समाजात रोष निर्माण झाला. गव्हर्नर नासीर अहमद इल रुफई यांना शेवटी आणिबाणी घोषित करावी लागली. अल्पवयीन मुलींना या अत्याचारापासून वाचवण्यासाठी पुरुषांचं सर्जिकल कास्ट्रेशन करण्याचा निर्णय गव्हर्नर नासीर यांनी घेतला. 14 वर्षांखालील मुलीवर बलात्कर करणाऱ्याला आता तिथं फाशी दिली जाणार आहे. महिलांनी असा अपराध सिद्ध झाला तर त्यांनाही अशाच प्रकारची शिक्षा देण्यात येणार आहे. दोन प्रकारे केलं जातं नपुंसक पुरुषांमध्ये शस्रक्रिया करून पुरुषाचा अंडकोश काढून टाकला जातो. जेणेकरून त्याला कामवासनाच होत नाही. या प्रकाराला सर्जिकल कास्ट्रेशन म्हणतात. दुसरा प्रकार म्हणजे त्या व्यक्तीला हॉर्मोन्सचं इंजेक्शन किंवा गोळी दिली जाते. त्यामुळेही कामवासना निघून जाते पण काही दिवसांनी पुन्हा ती इच्छा जागृत होते त्यामुळे ही औषधं वारंवार द्यावी लागतात. तसंच पुरुषाच्या अंडकोशावर केमिकल लावून त्याची कामवासना घालवली जाते. यात पाच वर्षांनी पुन्हा त्याला कामवासना येते. या दोन्ही पद्धतींना केमिकल कास्ट्रेशन म्हणतात. महिलांच्या गर्भाशयाची नाळ कापून त्यांची कामवासना घालवली जाते. या देशांत आहेत अशा शिक्षा इंडोनेशियामध्ये 2016 मध्ये यासंबंधी पारित केलेल्या कायद्यानुसार बलात्काराच्या दोषीला केमिकली नपुंसक केलं जातं. इथं पुरुषाच्या अंडकोशाला केमिकल लावण्याची पद्धत वापरतात. द सनच्या वृत्तानुसार स्वीडन, डेन्मार्क आणि कॅनडामध्येही दोषींना अनेकदा अशी शिक्षा करण्यात आली आहे. युक्रेनच्या संसदेत जुलै 2019 मध्ये असा कायदा करण्यात आला. त्यानुसार बलात्कार सिद्ध झाल्यास केमिकल कास्ट्रेशन केलं जातं आणि 18 वर्षांहून लहान तरुणाने गुन्हा केला असेल तर त्याला कास्ट्रेशन करत नाहीत. पाकिस्तानातही केमिकल कास्ट्रेशनची चर्चा सुरू होती. पंतप्रधान इम्रान खान यांनीच या विषयी चर्चा केली होती. कठोर कायद्यांमुळे अशा गुन्ह्यांना आळा बसू शकतो असं भारतीयांनाही वाटतं, त्यामुळे कठोर कारवाईची मागणी वारंवार केली जाते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या