15 डिसेंबर :अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने नव्या सूर्यमालेचा शोध लावला आहे. 'केप्लर स्पेस' टेलिस्कोपद्वारे हा शोध घेण्यात आला आहे. नासाचे हे मोठे यश मानले जाते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या सूर्यमालेत ८ ग्रह आहेत. नासाकडून या संदर्भातली कोणतीही घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. परंतु, आपल्या सूर्यमालेत ज्याप्रमाणे सूर्याभोवती ग्रह फिरत आहेत अगदी त्याचप्रमाणे नव्या सूर्यमालेतही एका ताऱ्याभोवती ग्रह फिरत आहेत.
पृथ्वीसारखा एखादा ग्रह या सूर्यमालेत आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र नव्या सूर्यमालेत 'केप्लर ९०' नावाच्या ताऱ्याभोवती चारही बाजूने इतर ग्रह फिरताना दिसत आहेत असं नासानं म्हटलं आहे. ही नवी सुर्यमाला पृथ्वीपासून २ हजार ५४५ प्रकाश वर्षे लांब असल्याची माहितीही समोर आली आहे.नवी सुर्यमाला पृथ्वीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी मोठी आहे.
With the discovery of an 8th planet orbiting another star 2,500 light years away, we now have another solar system that ties ours for number of worlds! Learn about the #Kepler90 system: https://t.co/AcSamwh07g pic.twitter.com/S50CPwjfOm
Loading...— NASA (@NASA) December 14, 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा