Home /News /videsh /

अलर्ट! 24046 Kmph वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येत आहे सर्वात मोठी उल्का, NASAचा इशारा

अलर्ट! 24046 Kmph वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येत आहे सर्वात मोठी उल्का, NASAचा इशारा

गेल्या महिन्यातच एक उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून गेली होती. आता पुन्हा एकदा आणखी एक उल्का पृथ्वीच्या जवळून 1 सप्टेंबर रोजी जाणार आहे.

गेल्या महिन्यातच एक उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून गेली होती. आता पुन्हा एकदा आणखी एक उल्का पृथ्वीच्या जवळून 1 सप्टेंबर रोजी जाणार आहे.

Asteroid 2020 RK2: असा अंदाज आहे की या उल्काचा व्यास 36 ते 81 मीटर आहे तर रुंदी 118 ते 265 फूट असू शकते.

    वॉशिंग्टन, 06 ऑक्टोबर : अमेरिकेच्या अंतराळ संस्था NASAने Asteroid 2020 RK2 नावाची उल्का वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचे सांगितले आहे. यासह, ही उल्का ऑक्टोबरपासून पृथ्वीच्या कक्षेत असेल. दरम्यान, नासानं हे स्पष्ट केले आहे की, ही उल्का पृथ्वीजवळून जाणार असली तरी, पृथ्वीचे नुकसान करणार नाही. मात्र या उल्कावर शास्त्रज्ञ नजर ठेवून आहेत. ही उल्का सप्टेंबरमध्ये वैज्ञानिकांनी प्रथम पाहिली. NASAच्या मते ही उल्का Asteroid 2020 RK2 ताशी 24046 किमी वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. असा अंदाज आहे की या उल्काचा व्यास 36 ते 81 मीटर आहे तर रुंदी 118 ते 265 फूट असू शकते. ही उल्का बोईंग 737 प्रवासी विमानांइतका मोठी असल्याचे सांगितले जात आहे. नासाने म्हटले आहे की ही उल्का पृथ्वीवरून दिसणार नाही. वाचा-पुण्यातील नवले पुलाजवळ विचित्र अपघात, 15 गाड्या एकमेकांवर आदळल्या! ईस्टर्न झोन टाईमनुसार ही उल्का दुपारी 1.12 वाजता आणि यूके वेळेनुसार संध्याकाळी 6.12 वाजता पृथ्वीच्या अगदी जवळबन जाईल. नासाचा अंदाज आहे की ही उल्का पृथ्वीपासून 2,378,482 मैलांचा प्रवास करेल. वाचा-दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवत कुटुंबाला लुबाडलं, VIDEO काढत बसले लोकं पण... 2025 पर्यंत कोणताही धोका नाही 2020-2025 दरम्यान, 2018 VP1 नावाची उल्का पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे हिची रुंदी 7 फूट आहे. Asteroid 2005 ED224 दरम्यान मोठा 177 फूट उल्का 2005 ईडी 224 पृथ्वीवर आदळेल. महत्त्वाचे म्हणजे नासाची सेंट्री सिस्टम आधीपासूनच अशा उल्कांवर नजर ठेवते. येत्या 100 वर्षांत 22 मोठ्या उल्का पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत, मात्र पृथ्वीला याचा धोका कमी आहे. या यादीतील प्रथम आणि सर्वात मोठी उल्का 29075 (1950 DA) जी 2880नंतर येणार आहे. ही उल्का अमेरिकेच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या तुलनेत तिचा आकार तीनपट आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Nasa

    पुढील बातम्या