Home /News /videsh /

10 वर्षात किती बदलला तळपता सूर्य, नासाने शेअर केला VIDEO

10 वर्षात किती बदलला तळपता सूर्य, नासाने शेअर केला VIDEO

    नवी दिल्ली, 27 जून : आपल्या आवकाशात सूर्याचा आकार त्याच्या मुखपृष्ठावर होणाऱ्या घडामोडी खगोलशास्त्राच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असतात. सौर यंत्रणेत कधी काय आणि कसं घडेल याचा अंदाज बांधला जात असतो. आमेरिकेतील स्पेस एजन्सी नासाने आपल्या अधिकृत यूट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सूर्यामध्ये कसे बदल होतात याचा व्हिडीओ काढण्यासाठी काही वैज्ञानिकांनी विशेष उपकरणं वापरली आहेत. विशिष्ट उपकरणांचा वापर करून सूर्यावर होणाऱ्या हालचाली कॅप्चर केल्या आहेत. नासाने 10 वर्षातील अनेक हालचाली टिपल्या आहेत. 2 जून 2010 ते 1 जून 2020 या कालावधीमध्ये सूर्यावरील वेगवेगळ्या हालचाली टिपण्यात आल्या आहेत. नासा सूर्यावर होणाऱ्या हालचालींचे बारकावे टिपत आहे. सूर्यावर होणाऱ्या रहस्यमयी हालचाली आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ वारंवार प्रयत्न करत असतात. हा 10 वर्षांमधला बदलता सूर्य पाहून तर सर्वजण चकीत झाले आहेत. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Nasa, Nasa news, NASA Scientist, Sun hit

    पुढील बातम्या