नासाची अनोखी सलामी! अंतराळात सापडलेल्या नव्या जीवाणूला डाॅ. कलामांचं नाव

नासाची अनोखी सलामी! अंतराळात सापडलेल्या नव्या जीवाणूला डाॅ. कलामांचं नाव

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना नासाची अनोखी सलामी

  • Share this:

22 मे : अमेरिकेच्या नासा या संस्थेने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात शोधून काढलेल्या एका नव्या जीवाणूला भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती आणि ख्यातनाम वैज्ञानिक डाॅ. एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव दिलं आहे. आतापर्यंत हा जीवाणू हा फक्त अंतराळात आढळला असून त्याचं पृथ्वीवर अस्तित्व नाही.

नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीच्या संशोधकांनी म्हटलं होतं, की आंतरग्रहीय पातळीवर फिरणाऱ्या एका अवकाशयानात म्हणजेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात फिल्टरमध्ये हा जीवाणू सापडला होता. या जीवाणूचा शोध ही नासाच्या शास्त्रज्ञांसाठी महत्वाची घटना होती.

सोलिबॅकिलस प्रजातीचा हा जीवाणू असून हा स्पोअर निर्माण करणारा जीवाणू आहे, असं जेपीएलचे वैज्ञानिक डॉ. कस्तुरी व्यंकटेश्वरन यांनी सांगितलं. त्याचं नाव सोलिबॅसिलस कलामी असं ठेवण्यात आलं आहे. त्यात भारतीय वैज्ञानिक कलाम यांच्या स्मृती जाग्या ठेवल्या आहेत.

कलाम यांनी नासात 1963 मध्ये सुरुवातीचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी केरळमधील थुंबा या गावात हिंदुस्थानचे पहिले रॉकेट प्रक्षेपण केंद्र उभारलं होतं.

अवकाश स्थानकाच्या ज्या फिल्टरवर हा जीवाणू सापडला तो फिल्टर 40 महिन्यांपासून तिथेच आहे. तो हाय एफिशियन्सी पार्टक्यिुलेट अरेस्टन्स फिल्टर म्हणजे एइपीए फिल्टर आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात स्वच्छता ठेवण्यासाठी फिल्टर वापरले जातात. इंटरनॅशनल जर्नल ऑफ सिस्टीमॅटिक अँड इव्होल्यूशनरी मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये या नवीन जीवाणूचा शोध लागल्याचं आणि त्याला कलाम यांचे नाव देण्यात आल्याचं नासातर्फे सांगण्यात आलं आहे.

First published: May 22, 2017, 9:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading