Home /News /videsh /

'पृथ्वीवरच सापडलं दुसरं ब्रह्मांड', नासाचे शास्त्रज्ञ असं का म्हणतायत?

'पृथ्वीवरच सापडलं दुसरं ब्रह्मांड', नासाचे शास्त्रज्ञ असं का म्हणतायत?

नासाच्या शास्त्रज्ञांनी अंटार्कटिकावर असं काही पाहिलं की ज्यामुळे त्यांनी पृथ्वीवर समांतर ब्रह्मांड असू शकतं असं म्हटलं.

    नवी दिल्ली, 20 मे : जगात काही अद्भुत घटना घडली तर वैज्ञानिक त्याची विज्ञानाच्या नजरेतून व्याख्या करतात. मात्र काही घटनांचे अर्थ शोधणं कठीण जातं. आता वैज्ञानिकांनी अंटार्कटिकामध्ये एका घटनेचा निष्कर्ष काढताना म्हटलं की आपल्या जवळपास एक दुसरं समांतर असं ब्रह्मांड आहे. सामान्यपणे कॉस्मिक किरणांचा उत्सर्ग अंतराळात होतो आणि ते आकाशात दिसतं. मात्र हाच वर्षाव जमिनीवर झाला तर वैज्ञानिकांचे सर्व सिद्धांत चुकीचे ठरतील आणि तसंच घडलं आहे. म्हणूनच हा निष्कर्ष वैज्ञानिकांना नाकारता येत नाही. याचं एक कारण समांतर ब्रह्मांड असू शकतं. नासाचे शास्त्रज्ञ अंटार्कटिकावर एक प्रयोग करत होते. यावेळी संशोधकांनी एका फुग्यावर लावलेल्या डिटेक्टरच्या माध्यमातून मिळालेल्या आकड्यांचा अभ्यास केला. हा रेडिओ डिटेक्टर कॉस्मिक किरणेही पकडू शकतो. वैज्ञानिकांनी अंटार्कटिका यासाठी निवडले होते कारण इथं किरणांवर इतर गोष्टींचा परिणाम कमी होतो. इथं ना वायू प्रदुषण ना ध्वनी प्रदुषणाचा अडथळा. रेडिओ डिटेक्टरचं नाव अंटार्कटिका इम्पल्सिव्ह ट्राझिएंट अँटीना (ANITA) असं आहे.  ANITA ने 2006 आणि 2014 च्या उड्डाणावेळी एक उच्च ऊर्जा कणांना निघताना पाहिलं. याचं संशोधन केल्यानंतर असं समोर आलं की हे कण परावर्तित नव्हते तर उत्सर्जन झाल्यानंतर खालून वरती जात होते. म्हणजेच कॉस्मिक किरणांचा पाऊस पडत असल्याचं 2016 मध्ये झालेल्या अभ्यासातून समोर आलं. हे वाचा : कोरोनामुक्त रुग्ण पुन्हा कोरोनाग्रस्त झाल्यास त्याच्यामार्फत व्हायरस पसरतो का? नासाच्या वैज्ञानिकांना वाटतं की, त्यांनी हा प्रयोग करताना समांतर ब्रह्मांडाचं प्रमाण शोधलं आहे. हा एक मोठा दावा असू शकतो. याचे संशोधक म्हणतात की, त्यांना अशी जागा सापडली आहे ज्याला भौतिक नियम लागू होत नाही. त्यामुळेच त्या जागेला एक समांतर ब्रह्मांड म्हटलं जात आहे. संशोधकांनी असाही अंदाज व्यक्त केला आहे की उलटा पाऊस म्हणजे कण विरुद्ध दिशेने उत्सर्जित होणं हेच दाखवतं की कण वेळेच्या विरुद्ध दिशेनं जात आहेत. यासाठी आपल्याकडं एक समांतर ब्रह्मांड असल्याचं वाटतं. हे वाचा : Amphan Cyclone : वादळात उडाली शेड आणि बराच वेळ उडत राहिल्या ठिणग्या, पाहा VIDEO भौतिकशास्त्राचे प्राध्यापक पीटर ग्राहम यांनी सांगितलं की, कॉस्मिक किरणं बर्फातून निघतात असं वाटतं. ही खूप विचित्र गोष्ट आहे. हे भौतिक नियमांच्या विरुद्ध आहे. यासाठीच आम्ही हा शोध जाहीर कऱण्याचा निर्णय घेतला. कण वरच्या दिशेने जात आहेत आणि ते पृथ्वीच्या पोटातून येत असल्यासारखं वाटतं. हे वाचा : अरे देवा! आता ढगातूनही 'कोरोना'चा अटॅक; VIDEO पाहून तु्म्हीही थक्क व्हाल कॉस्मिक किरणं एवढ्या मोठ्या संख्येनं येऊ शकत नाहीत. त्यामुळे ही किरणं पृथ्वीच्या आता झालेल्या सुपरनोव्हाच्या स्फोटातून येत असावीत असाही अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र सर्वच लोक हे स्वीकारणार नाहीत. अजुन काही सिद्ध होत नाहीय मात्र शोधासाठी अनंत शक्यता दिसत असल्याचंही पीटर ग्राहम यांनी सांगितले. हे वाचा : Lockdown मध्ये भूतदया! साथ देणाऱ्या मुक्या प्राण्याची वृद्ध महिला घेतेय काळजी
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या