VIDEO : NASA ने मंगळाच्या दिशेने सोडलं Rover, परग्रहावर पहिल्यांदाच उतरणार पृथ्वीवरचं हेलिकॉप्टर

नासाचा पर्सिवियरेंस रोवर मंगळावर माणूस जाऊ शकतो की नाही याच्या तयारीचा एक भाग आहे.

नासाचा पर्सिवियरेंस रोवर मंगळावर माणूस जाऊ शकतो की नाही याच्या तयारीचा एक भाग आहे.

  • Share this:
    वॉशिंग्टन, 30 जुलै : नासाच्या पर्सिवियरेंस रोवरच्या प्रक्षेपणाबाबत एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. Perseverance Rover चे प्रक्षेपण झाले आहे. मंगळ हा नासासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. विशेष म्हणजे हा एक योगायोग आहे की यूएई आणि चीननेही आपले यान मंगळासाठी प्रक्षेपित केले आहे. यामध्ये चीनच्या अंतरिक्ष यानासह त्याच रोवर ही गेलं आहे. जे मंगळ ग्रहावर उतरेल. मात्र नासाचा पर्सिवियरेंस रोवर अनेक कारणांनी खास आहे. यापूर्वीही नासाचे अनेक रोवर मंगळाच्या दिशेने झेपावले होते. 23 वर्षांपूर्वी सुरू झाला हा प्रयत्न नासाच्या मंगळासाठी रोवर अभियानाची सुरुवात 1997 मध्ये मार्स पाथफाउंडप मिशनने झाली. या मिशनच्या माध्यमातून नासाने मंगळवर पहिलं रोवर उतरवलं. सोजर्नर नावाच्या या रोवरबाबत अनेकांच्या फार आशा नव्हत्या. मात्र याच्या यशानंतर 2003 मध्ये रोवर मंगळावर पाठवलं. काय आहे अंतर एक फूट लांब असा हा खेळण्याप्रमाणे दिसणारा रोजर्नर रोवर मंगळावर 83 दिवस काम करीत होता. त्यानंतर स्पिरिय आणि ऑपच्युनिटी रोवर गोल्फ कार्टाच्या आकाराचे होते. ते 6 आणि 15 वर्षांपर्यंत काम करीत होते. रोवर अंतरिक्ष यानाच्या तुलनेत अधिक चांगले असतात. कारण ते ग्रहाच्या जवळ असतात आणि अधिक स्वच्छ व स्पष्ट छायाचित्र देऊ शकतात. याला उपग्रहणासारखं वापरुन फोटो घेता येऊ शकतो. पर्सवियरेंस का आहे खास या रोवरमध्ये खास उपकरण जोडण्यात आले आहे. यामध्ये अनेक उपकरण म्हणजे इन सीटू रियोर्स युटिलाइजेशन प्रयोगासंबंधित आहे. म्हणजे असे प्रयोग ज्यात त्या भागातील संसाधनांचा वापर करता येऊ शकतो. यामुळे मंगळावर ऑक्सीजन तयार करण्यासाठी मॉक्सी सर्वात खास उपकरण आहे जो मंगळावर कार्बन डाय ऑक्साइडने ऑक्सीजनाची निर्मिती करेल.
    Published by:Meenal Gangurde
    First published: