पाहा अशी दिसते अंतराळातून पृथ्वी,नासाच्या स्पेस स्टेशनमधून LIVE व्हिडिओ

पाहा अशी दिसते अंतराळातून पृथ्वी,नासाच्या स्पेस स्टेशनमधून LIVE व्हिडिओ

नासा या संशोधन केंद्राने एक प्रयत्न केला आहे. नासाच्या ISS (International Space Station) ने अंतराळात पाठवलेल्या यानातून आपण आपल्या पृथ्वीची नाना रूपं लाईव्ह पाहू शकतो

  • Share this:

13 मे : नासा या संशोधन केंद्राने एक प्रयत्न केला आहे. नासाच्या ISS (International Space Station) ने अंतराळात पाठवलेल्या यानातून आपण आपल्या पृथ्वीची नाना रूपं लाईव्ह पाहू शकतो. हे लाईव्ह स्ट्रिमिंग 22 ऑक्टोबर 2016 पासून सुरू करण्यात आलंय.

सुंदरतेने नटलेल्या पृथ्वीचे चित्रण हे HDEV (High Definition Earth Viewing) या कॅमेरामधून होत आहे. ISS नुसार इतर ग्रहापासून  पृथ्वीच्या कमी कक्षातील जागेच्या काठावर 240 मैल अंतरावर पृथ्वीचा विस्तार आहे.

ISS सोबत नासाचे अंतराळवीर त्याचबरोबर रशियन, कॅनेडियन आणि युरोपियन अंतराळवीर कार्यरत आहेत.

या स्ट्रिमिंगमध्ये काही लाईव्ह तर काही आधी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आहेत. अंतराळात जेव्हा रात्र होते. तेव्हा प्रत्येक 45 मिनिटांचा व्हिडिओ या स्ट्रिमिंगमध्ये आपल्याला पहायला मिळणार नाही, परंतू दिवस उजेडताच हे स्ट्रिमिंग पुन्हा चालू होते. या स्ट्रिमिंगमध्ये आपल्या पृथ्वीच्या सुंदर प्रतिमा आहेत.

(courtesy by @ Space Videos)

First published: May 13, 2017, 9:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading